Ramayan Movie Updates: बॉलिवूडमध्ये एका मल्टिस्टारर सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तो म्हणजे नितेश तिवारींचा 'रामायण' (Ramayan). या सिनेमातरणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतामातेच्या भूमिकेत आहे. सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट आता फायनल झाली आहे आणि पुढच्या महिन्यात शूटिंगही सुरु होणार आहे. 'रामायण' सिनेमाचं बहुतांश शूटिंग हे मुंबईतच होणार असल्याचं समोर आलं आहे. तसंच रावणाची लंका कुठे उभारण्यात येणार यासंदर्भात माहिती मिळाली आहे.
'दंगल' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा 'रामायण' प्रोजेक्ट चर्चेत आहे. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. Animal मध्ये वेगळ्याच भूमिकेत दिसलेला रणबीर कपूर आता प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार असल्याने त्याचे चाहते खूपच उत्साहित आहेत. माध्यम रिपोर्टनुसार, सिनेमाचं बहुतांश चित्रीकरण हे मुंबईतच होईल. पहिले 60 दिवस रणबीर मुंबईतच शूट करेल. यानंतरचं शूट लंडनमध्ये होणार आहे. लंकादहनचा संपूर्ण सीन हा लंडनमध्येच असणार आहे. तेथील शेड्यूलमध्ये रणबीरसोबत केजीएफ फेम अभिनेता यशही असणार आहे. कारण रावणाच्या यश ला फायनल करण्यात आले आहे.
अशी आहे 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट
'रामायण' हा मल्टिस्टारर सिनेमा आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीतामाता, यश रावण तर हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. याशिवाय दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपति बिभीषणाच्या भूमिकेत दिसणार आहे. लारा दत्ताला कैकयीच्या रोलसाठी फायनल करण्यात आले आहे.
'रामायण'कास्टसंदर्भात कोणतेही अधिकृत स्टेटमेंट अद्याप आलेले नाही. मात्र या नावांची मनोरंजनसृष्टीत जोरदार चर्चा रंगली आहे.