Join us

रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा आहे 'गॉसिप क्वीन', आलिया भटने नणंदेची केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 1:04 PM

Alia Bhatt On Riddhima Kapoor : आलिया भटचे तिची नणंद रिद्धिमा कपूरसोबत छान बॉण्डिंग आहे. आता आलियाने नणंदेबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.

अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor)ची बहिण रिद्धिमा कपूर साहनी(Riddhima Kapoor Sahni) ने नुकतेच रिएलिटी सीरिज फॅब्युलस लाइव्स वर्सेस बॉलिवूड वाइव्स सीझन ३मधून पदार्पण केले आहे. या शोच्या प्रमोशनदरम्यान आलिया भटने नणंदेवर प्रेमाचा वर्षाव केला आणि गॉसिप करण्यात ती रणबीरच्या पुढे असल्याचेही म्हटले. आलियाने रिद्धिमाला राहाची सर्वात एण्टरटेनिंग आत्या संबोधलं आहे.

गलाट्टा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रिद्धिमा कपूर साहनीला आलिया भटकडून एक मेसेज मिळाला होता. आलिया म्हणाली की, तिला रिद्धिमाचा खूप अभिमान वाटतो आणि नेहमीच ती दमदार राहिली आहे. आलिया पुढे म्हणाली की, रिद्धिमा गॉसिप क्वीन होती आणि याबाबतीत तिचा भाऊ रणबीर कपूरच्याही पुढे आहे. जर जगात कोणी आहे जिच्याकडे खूप बातम्या आहेत, तर ती रिद्धिमा आहे. ती कुठलाही विचार न करता सर्वात मोठ्या गॉसिप्सचे बॉम्ब फोडते आणि हे बऱ्याचदा खरे असते. त्यामुळे ती आमच्या सगळ्यांच्या खूप पुढे आहे, विशेष म्हणजे भावापासून.

राहाची एण्टरटेनिंग बुवाआलिया भटने तिची लेक राहासोबत रिद्धिमाचे असलेल्या नात्याबद्दल सांगितले की, सर्वात एण्टरटेनिंग, छान आत्या आहे जिने राहाला प्रत्येक गोष्ट शिकवली आहे. आलिया पुढे म्हणाली की, तिच्यामुळे रिद्धिमा राहासाठी उमा जोशींची ही ही गाण गाते. रिद्धिमाला नणंद न म्हणता बहिण म्हणत रिद्धिमा तिच्या आयुष्यात आहे, त्यासाठी स्वतःला नशीबवान मानते.

आलियाच्या मेसेजवर रिद्धिमाने दिली अशी प्रतिक्रियाआलिया भटच्या मेसेजवर प्रतिक्रिया देताना, रिद्धिमा कपूर साहनीने एकमेकांच्या कंम्फर्टबद्दल सांगितले. ती म्हणाली की, तिने आलिया आणि रणबीरला त्यांची जागा देण्याचे निश्चित केले. रिद्धिमा म्हणाली की, आलिया कुटुंबासोबत जोडण्यासाठी खूप प्रयत्न करते. त्यांच्यात नॅचरल बॉण्ड आहे.   

टॅग्स :आलिया भटरिद्धिमा कपूर