कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत त्यामुळे एका पाठोपाठ अनेक नावाजलेले कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. यामध्येच आता बॉलिवूडचा हँडसम हंक रणदीप हुड्डा (Randeep hooda) बोहल्यावर चढणार आहे. रणदीप त्यांच्या लाँग टाइम गर्लफ्रेंड लीन लॅशराम (lin laishram) हिच्यासोबत लग्न करणार आहे. अभिनेता सोमवारी इम्फाळला पोहोचला. रणदीप लीन लैशरामसोबत इम्फाळला लग्न करणार आहे. दोघांनी इम्फाळमधील हिनगांग येथील मंदिरात प्रार्थना केली.
मीडिया रिपोर्टनुसार, रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम 29 नोव्हेंबरला मणिपूरमध्ये लग्न करणार आहेत. २९ नोव्हेंबरला दुपारपासून सुरू होणारे लग्नाचे विधी रात्रीपर्यंत चालणार आहेत. मणिपूरच्या परंपरेनुसार हे कपल मणिपुरी पोशाख घालून लग्न करणार आहेत. काही जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत मणिपूरमध्ये लग्न झाल्यानंतर अभिनेता रणदीप हुड्डा मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहे. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहरे रिसेप्शनला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
रणदीप आणि लिन 2016 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लिन ही मणिपूरची रहिवासी आहे आणि ती व्यवसायाने भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे.रणदीपची होणारी बायको ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. रणदीप हुड्डा 47 वर्षांचा आहे, तर लिन लैशराम 37 वर्षांची आहे.
लीन मूळची मणिपूरमधील इंफाळ येथील असून ती प्रियांका चोप्राच्या 'मेरी कॉम' या सिनेमात झळकली आहे. तसंच तिने 'रंगून', 'उमरिका' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर शाहरुखच्या ओम शांती ओम या सिनेमातही तिने स्क्रीन शेअर केली आहे. अलिकडेच ती करिना कपूरच्या 'जाने जान' या सिनेमात झळकली.