Join us

"माझ्या अहंकारामुळे सिनेमा हातातून गेला", रणदीप हुडाचा खुलासा; 'रंग दे बसंती' मध्ये दिसला असता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:10 IST

रणदीप हुडाने का नाकारला रंग दे बसंती?

राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा सर्वात गाजलेला सिनेमा 'रंग दे बसंती'. यामध्ये आमिर खान, आर माधवन, कुणाल कपूर, सोहा अली खान, सिद्धार्थ, शर्मन जोशी अशी कलाकारांची फौज होती. हा भारतीय इतिहासातील सर्वत्तोम सिनेमांपैकी एक आहे. अभिनेता रणदीप हुडालाही (Randeep Hooda)  सिनेमात एक भूमिका ऑफर झाली होती असा त्याने नुकताच खुलासा केला. 

रणदीप हुडा सध्या 'जाट' सिनेमात दिसत आहे. सनी देओलसोबत त्याने स्क्रीन शेअर केली आहे. यानिमित्त एका मुलाखतीत रणदीपने रंग दे बसंतीचा उल्लेख केला. या सिनेमात त्याला करण सिंहानिया उर्फ भगत सिंह(सिद्धार्थ)ची भूमिका ऑफर झाली होती. मात्र इतकी छोटी भूमिका साकारण्यास त्याने नकार दिला होता. तो म्हणाला, "माझ्या अहंकारामुळे तो सिनेमा माझ्या हातातून गेला. जर मी तो सिनेमा केला असता तर आज मी वेगळ्या लीगमध्ये असतो. मी ऑडिशन दिली होती आणि त्यांना आवडलीही होती. राकेश मेहरा कधी कधी नशेतच गाडी चालवत माझ्याकडे यायचे आणि मला म्हणायचे कर ले, पिक्चर कर ले!"

तो पुढे म्हणाला, "मी तेव्हा इंडस्ट्रीत फक्त दोन लोकांना ओळखत होतो. एक राम गोपाल वर्मा आणि दुसरी माझी गर्लफ्रेंड. गर्लफ्रेंडनेच मला सिनेमा सिनेमात छोटी भूमिका करण्यास मनाई केली. नंतर राम गोपाल वर्माही तेच म्हणाले. ते म्हणाले मी तुला सिनेमा मुख्य भूमिकेत घ्यायचा विचार करतोय आणि तुला तिकडे पोस्टरवर आमिरच्या मागे उभं राहायचंय? माझाही जाट अहंकार मध्ये आला आणि मी म्हणालो की मी आमिरच्या मागे उभा राहणार नाही. असंच मी पुढे रॉक ऑन सिनेमाही नाकारला. मी नेहमीच जरा वेगळ्या निर्माते, दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे ना की इंडस्ट्रीतल्या लोकांसोबत काम केलं. म्हणूनच कदाचित माझी ग्रोथ हळूहळू झाली."

टॅग्स :रणदीप हुडाआमिर खानबॉलिवूड