Join us

'रणदीपला मला विना मेकअप बघायचे होते' अंकिताने सांगितला 'वीर सावरकर' सिनेमाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 12:38 PM

अंकिता लोखंडेने सिनेमात यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे.

'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेचं 'बिग बॉस' नंतर नशीबच चमकलं. रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात तिला महत्वाची भूमिका मिळाली. नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. रणदीप हुडाने वीर सावरकरांची भूमिका जगली आहे असंच ट्रेलरमधून जाणवत आहे. इतकंच नाही तर त्याने स्वत: सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेरसिकांची  सिनेमा पाहण्याची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. 

'वीर सावरकर' सिनेमात अंकिता लोखंडेने यमुनाबाई सावरकर ही भूमिका साकारली आहे. यमुनाबाई या सावरकरांच्या पत्नी आहेत. पतीप्रमाणेच त्याही अतिशय कणखर आहेत. अंकिताने भूमिकेची तयारी करताना आलेला अनुभव सांगितला. ती म्हणाली, "यमुनाबाई यांनी त्यांच्या आयुष्यात खूप दु:ख सोसलं आहे. हे मी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मी माझ्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकले की नाही माहित नाही पण मी नेहमीच तसा प्रयत्न करते. जसं दिग्दर्शकाला हवं आहे ते साकारायचा माझा प्रयत्न असतो."

रणदीपला मला मेकअप विना बघायचे होते

ती पुढे म्हणाली, "भूमिकेची तयारी करताना रणदीपने हे स्पष्ट केलं होतं की मी मेकअप करु नये. यमुनाबाई या नॅचरली पडद्यावर दिसल्या पाहिजेत अशी त्याची इच्छा होती. तसंच भूमिकेची तयारी करताना त्याने मला कलाकार म्हणून स्वातंत्र्य दिलं. ही भूमिका संवादांबाबतीत नाही तर अभिव्यक्तीबाबतीत आहे."

'वीर सावरकर' सिनेमा २२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये सिनेमा असणार आहे.'स्वातंत्र्यवीर सावरकर'च्या ट्रेलरमध्ये सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हूडाच्या अभिनयाचा जबरदस्त आविष्कार बघायला मिळतो. रणदीपचा लूक, त्याची शरीरयष्टी, देहबोली हुबेहुब सावरकरांसारखी दिसते. 

टॅग्स :अंकिता लोखंडेरणदीप हुडाविनायक दामोदर सावरकरसिनेमा