अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hudda) सध्या त्याच्या आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swantantrya Veer Savarkar ) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो अभिनयासोबतच दिग्दर्शकाची भूमिकाही बजावत आहे. होय, या आगामी चित्रपटातून रणदीप दिग्दर्शनाच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे. याआधी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांच्याकडे देण्यात आल्याच्या बातम्या होत्या. पण, महेश मांजरेकरांनी या चित्रपटातून माघार घेतली आहे. नुकतेच महेश मांजरेकर यांनी यावर मौन सोडले आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी खुलासा केला की, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांना पहिल्यांदा सोपवण्यात आली होती. मात्र, रणदीप हुड्डाने या चित्रपटात खूप ढवळाढवळ करून अनेक बदल करण्याचा प्रयत्न केला. महेश मांजरेकर म्हणाले की, चित्रपटात करण्यात आलेल्या या बदलांमुळे मी हा प्रकल्प सोडण्याचा निर्णय घेतला.
रणदीप या प्रोजेक्टमध्ये गुंतलेला आहे...महेश मांजरेकर पुढे म्हणाले की, रणदीप हुड्डाने ज्याप्रकारे या व्यक्तिरेखेसाठी संशोधन केले ते पाहून मी प्रभावित झालो. जेव्हा मी रणदीपला भेटलो तेव्हा मी पाहिले की तो खूप हुशार आहे आणि या प्रोजेक्टमध्ये खूप गुंतलेला आहे. आमच्या अनेक बैठका झाल्या. या विषयावर आधारित अनेक पुस्तके त्याने वाचले. मी त्याची आवड पाहिली. त्याने पहिला मसुदा वाचून दाखवला, त्यात त्याला काही अडचणी आल्या, म्हणून मीही सहमती दिली. पण, त्यानंतर दुसऱ्या मसुद्यातही त्याला अडचणी आल्या. मी त्याला म्हणालो, 'असं झालं तर या चित्रपटाला अडचण येईल. एकदा स्क्रिप्ट फायनल झाल्यावर तो मला कोणतेही प्रश्न विचारणार नाही, असे आश्वासन त्याने दिले.
...तर चित्रपट बनणार नाही
महेश मांजरेकर यांच्या म्हणण्यानुसार, रणदीपच्या स्वतःच्या काही कल्पना होत्या, ज्या त्याला स्क्रिप्टमध्ये जोडायच्या होत्या. यामुळे अडचणी निर्माण झाल्या. मांजरेकर म्हणाले, 'मला वाटले की तो मला चित्रपट कसा बनवायचा हे सांगत आहे. मी माझ्या पद्धतीने दिग्दर्शन करणार असल्याचे स्पष्ट केले. मला पुन्हा जाणवले की तो मला काम करू देत नाही. मी निर्मात्यांना भेटलो. मी त्याला सांगितले की जर आपण दोघे या चित्रपटाचा भाग असू तर हा चित्रपट बनणार नाही. त्यामुळे एकतर मी चित्रपटात असेल किंवा रणदीप'. महेश मांजरेकर म्हणतात की, निर्मात्यांना आता कळत असेल की त्यांनी चुकीचा निर्णय घेतला.