Join us

कुठे हरवली 'बॉर्डर' सिनेमातील ही अभिनेत्री? वयाच्या 54 व्या वर्षीही आहे सिंगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 18:46 IST

Sharbani mukherjee: 'बॉर्डर'नंतर ती 'घर आजा सोनिया' या म्युझिक व्हिडीओत झळकली. त्यानंतर तिने तिचा मोर्चा साऊथकडे वळवला. परंतु, तिला हवं तसं यश मिळालं नाही.

1997 साली प्रदर्शित झालेल्या मल्टीस्टारर 'बॉर्डर' या सिनेमाचं नाव आजही लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत घेतलं जातं. अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ आणि सनी देओल यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला होता. केवळ हा सिनेमाच नाही तर यातील गाणीही सुपरहिट झाली होती. आजही ही गाणी बऱ्याचदा स्वातंत्र्यदिन वा प्रजासताकदिनाच्या दिवशी आवर्जुन लावली जातात. या चित्रपटातील अभिनेते जितके चर्चेत आले तितकीच त्यातील काही अभिनेत्रींचीही चर्चा झाली. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे शरबानी मुखर्जी. या सिनेमात तिने सुनील शेट्टीच्या पत्नीची भूमिका साकारली होती.शरबानी मुखर्जी हिच्या वाट्याला या सिनेमातील लहानशी भूमिका आली. मात्र, त्यातूनही ती तुफान लोकप्रिय झाली. त्यामुळेच ही अभिनेत्री आता काय करते, कशी दिसते असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. त्यामुळे तिच्याविषयी आज जाणून घेऊयात.

बॉर्डरमध्ये सुनील शेट्टी आणि शरबानी यांच्यावर 'ए जाते हुए लम्हो' हे रोमॅण्टिक गाणं शूट करण्यात आलं होतं. हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं. मात्र, त्यानंतर ही अभिनेत्री फारशी कोणत्या चित्रपटात झळकली नाही. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने कलाविश्वातून तिचा काढता पाय घेतला आहे. इतकंच नाही तर अद्यापही ती अविवाहित आहे.

काय करते शरबानी?

बॉर्डरनंतर ती घर आजा सोनिया या म्युझिक व्हिडीओत झळकली. त्यानंतर तिने तिचा मोर्चा साऊथकडे वळवला. परंतु, तिला हवं तसं यश मिळालं नाही. त्यानंतर मात्र, तिने कलाविश्वातून काढता पाय घेतला. शरबानी आज ५४ वर्षांची असून अजूनही सिंगल आहे. बऱ्याचदा ती दुर्गापूजेच्यावेळी दिसून येते.काजोल-राणीसोबत आहे खास नातं.

शरबानी ही काजोल, राणी मुखर्जी यांची चुलत बहीण आहे. त्यामुळे अनेकदा त्यांच्यासोबत फोटोमध्ये ती दिसून येते. तसंच दुर्गापूजेच्यावेळीही ती आवर्जुन तिच्या बहिणींसोबत येते. 

टॅग्स :बॉलिवूडसिनेमासीमारेषासेलिब्रिटीसनी देओलसुनील शेट्टी