राणी मुखर्जी स्टारर ‘हिचकी’चे नवे गाणे ‘फिर क्या गम है’ तुम्ही पाहिले?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 8:28 AM
राणी मुखर्जी हिचा‘हिचकी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे नवे गाणे ‘फिर क्या गम है’ आज रिलीज झाले.
राणी मुखर्जी हिचा‘हिचकी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे नवे गाणे ‘फिर क्या गम है’ आज रिलीज झाले. गायिका शिल्पा राव हिने या गाण्याला आवाज दिला आहे. शिल्पाने यापूर्वी ‘धूम3’चे ‘मलंग’, ‘ये जवानी है दिवानी’तील ‘सुब्बहान अल्लाह’ अशी अनेक गाणी गायली आहेत. शिल्पाचे केकेसोबत गायलेले ‘बचना ए हसीनो’ हे गाणे चांगलेच लोकप्रीय झाले होते. ‘फिर क्या गम है’ हे ‘हिचकी’चे चौथे गाणे आहे. यापूर्वी ‘ओए हिचकी’,‘मॅडम जी गो ईजी’, ‘खोल दो पर’ ही तीन गाणी रिलीज झाली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी नैना माथूर नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. नैनाला टॉरेट सिंड्रोम नावाच्या आजाराने ग्रासलेले असते. त्यामुळी ती बोलताना अडखळते आणि एकच वाक्य दोनदा बोलते. शिवाय बोलता बोलता विचित्र आवाज काढते. या सवयीमुळे तिच्या आयुष्यात कशी आव्हाने येतात आणि त्यांना ती कशी सामोरे जाते,हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. नैनाची शिक्षिका बनायची इच्छा आहे. पण या आजारपणामुळे ती शिक्षिका होऊ शकत नाही, हे तिला सांगण्यात येते. इथून पुढे तिच्या संघर्षाची गोष्ट सुरु होते. महेश शर्मा निर्मित आणि सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित हा चित्रपट २३ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ALSO READ : श्रीदेवींची ‘ती’ इच्छा आता कधीच पूर्ण करू शकणार नाही राणी मुखर्जी...! ‘मर्दानी’ हा राणीचा अखेरचा चित्रपट होता. ‘मर्दानी’नंतर चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘हिचकी’द्वारे राणी पुन्हा मोठ्या पडद्यावर परतली आहे. २०१४ मध्ये राणीचा ‘मर्दानी’ हा चित्रपट रिलीज झाला होता. सन १९९७ मध्ये ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटाद्वारे राणीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार यश मिळवू शकला नाही. पण यातील राणीच्या अभिनयाने पे्रक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. २१ एप्रिल २०१४ रोजी राणीने पॅरिसमध्ये दिग्दर्शक व निर्माता आदित्य चोप्राशी गुपचूप लग्न केले होते. ९ डिसेंबर २०१५ रोजी राणीने आदिराला जन्म दिला होता.