‘हिचकी’साठी राणी मुखर्जीने घेतला मनाविरूद्ध निर्णय! सोशल मीडियावर करणार डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 6:39 AM
राणी मुखर्जी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. होय, ‘हिचकी’ या चित्रपटात राणी मुख्य भूमिकेत आहेत. आता चित्रपट म्हटल्यावर ...
राणी मुखर्जी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. होय, ‘हिचकी’ या चित्रपटात राणी मुख्य भूमिकेत आहेत. आता चित्रपट म्हटल्यावर त्याचे प्रमोशन आलेच आणि प्रमोशन म्हटल्यावर सोशल मीडियाही आलाय. आजघडीला प्रमोशनसाठी सोशल मीडियावाचून पर्याय नाही. कदाचित म्हणूनच राणी सोशल मीडियावरही डेब्यू करतेय. होय, फेसबुक, टिष्ट्वटर आणि इन्स्टाग्रामवर राणी लवकरच डेब्यू करणार आहे.राणीच्या एका जवळच्या व्यक्तिने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर येण्यास राणी अजिबात इंटरेस्टिंग नव्हती. पण ‘हिचकी’च्या प्रमोशनसाठी राणीला सोशल मीडियावर येण्याची विनंती केली गेली आणि राणी यासाठी तयार झाली. आता राणी आपल्या चाहत्यांशी थेट संवाद साधू शकणार आहे. राणीचे मानाल तर सोशल मीडियावर येण्याआधी ती कमालीची नर्व्हस आहे. मी चाहत्यांना भेटण्यास उत्सूक आहे. डिजिटल युगात चाहत्यांशी संपर्क ठेवण्याचे सोशल मीडियाइतके प्रभावी दुसरे कुठलेही माध्यम नाही. पण खरे सांगायचे तर सोशल मीडियावर येण्याआधी मला बरेच होमवर्क करावे लागणार आहे. मला यातल्या बºयाच गोष्टी माहित नाही. त्यामुळे मला अनेक गोष्टी शिकाव्या लागतील, असे ती म्हणाली. राणीचा पती आणि निर्माता - दिग्दर्शक आदित्य चोप्रा अद्यापही सोशल मीडियापासून दूर आहे. त्यामुळे राणीच्या पावलावर पाऊल टाकत आदित्यही सोशल मीडियावर येतो का, हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.ALSO READ : २२ वर्षांपासून ‘या’ समस्येशी लढतेयं राणी मुखर्जी! कुणालाही नव्हती खबर!!राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा सिनेमा सिद्धार्थ पी मल्होत्राने दिग्दर्शित केला आहे. गत आॅक्टोबरमध्ये राणीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले होते. २०१४ मध्ये राणीचा ‘मर्दानी’ हा चित्रपट रिलीज झाला होता. सन १९९७ मध्ये ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटाद्वारे राणीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार यश मिळवू शकला नाही. पण यातील राणीच्या अभिनयाने पे्रक्षकांना मंत्रमुग्ध केले होते.२१ एप्रिल २०१४ रोजी राणीने पॅरिसमध्ये दिग्दर्शक व निमार्ता आदित्य चोप्राशी गुपचूप लग्न केले होते. ९ डिसेंबर २०१५ रोजी राणीने आदिराला जन्म दिला होता.