Join us

बॉडी शेमिंगची शिकार झाली मिस युनिव्हर्स, 'म्हातारी' अन् 'जाड' म्हणत ट्रोल करणाऱ्यांना लारा दत्ताने दिलं चोख उत्तर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 2:19 PM

लारा दत्ताने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं आहे.

 बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ता हिला ओळखलं जातं. लारा दत्तने केवळ भारतातच नाही तर जगभरात आपले नाव कमावले आहे. २००० मध्ये लारा दत्तने मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला आणि तेव्हापासून आजतागायत ती नेहमीच चर्चेत असते. सध्या लारा दत्ता सध्या तिच्या आगामी 'स्ट्रॅटेजी: बालाकोट अँड बियॉन्ड' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या प्रमोशनदरम्यान लाराने बॉडी शेमिंग आणि अलीकडच्या काळात केल्या जाणाऱ्या सोशल मीडिया ट्रोलिंगबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

लारा दत्तानं नुकतेच 'पिंकव्हिला'ला मुलाखत दिली. यावेळी लारा म्हणाली, 'सोशल मीडियावर फारशी फॅन फॉलोइंग नाही. काही फॉलोअर्स आहेत ज्यांना मी खरोखर आवडते. ते मला  कधीही निराश करत नाहीत. मला असं वाटतं की लोकांना त्यांची मतं मांडण्याचा अधिकार आहे, ते मला म्हातारी म्हणतील, लठ्ठ म्हणतील, पण या सर्व गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? मला माहित आहे की ट्रोलिंग करणारे काही लोकं आहेत.  लोक स्वतःच त्यांच्या आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे त्रस्त असतात आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात काय हवे आहे हे माहित नसते'.

लारा दत्ताने एकेकाळी तिने एकामागून एक सुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. अभिनयाची पार्श्वभूमी नसताना देखील लारा दत्ताने बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे.  मागच्या काही काळपासून अभिनयक्षेत्रापासून दूर असणारी लारा आता कमबॅक करत आहे. लारा दत्ता हिची 'स्ट्रॅटेजी: बालाकोट अँड बियॉन्ड' ही वेबसीरिज  2019 मध्ये पुलवामा आणि बालाकोटमध्ये घडलेल्या घटनांच्या अनेक पैलूंवर आणि रणनीतीवर प्रकाश टाकणार आहे.

संतोष सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिरीजमध्ये लारा दत्ता, आशुतोष राणा, आशिष विद्यार्थी, जिमी शेरगिल, प्रसन्ना यांच्यासह अनेक स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही सीरिज २५ एप्रिलपासून जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. मुंबई, पंजाब, पतियाळा, जम्मू काश्मीर, दिल्लीव्यतिरिक्त आम्ही सर्बियामध्ये या सिरीजचे चित्रीकरण करण्यात आलं आहे. 

टॅग्स :लारा दत्तासेलिब्रिटीबॉलिवूडजिओसोशल मीडिया