Join us

 लॉकडाऊनने वाढवल्या रानू मंडलच्या चिंता; कित्येक दिवसांपासून मिळेना काम  

By रूपाली मुधोळकर | Updated: October 12, 2020 11:18 IST

पश्चिम बंगलाच्या रानाघाट रेल्वे स्टेशनवर गाणी गात भीक मागणा-या रानूचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि या व्हिडीओने रानू एका रात्रीत स्टार झाली...

ठळक मुद्देमीडियालाही ती अ‍ॅटिट्यूड दाखवताना दिसली होती. याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता.

‘एक प्यार नगमा है’ या गाण्यामुळे रानू मंडल रातोरात स्टार बनली. आपण कधी बॉलिवूडसाठी गाणी गाऊ हा विचार रानू मंडलने स्वप्नातही केला नव्हता. पण पश्चिम बंगलाच्या रानाघाट रेल्वे स्टेशनवर गाणी गात भीक मागणा-या रानूचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि या व्हिडीओने रानू एका रात्रीत स्टार झाली. हिमेश रेशमियाने रानूला त्याच्या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली आणि रानू सगळ्यांच्या डोळ्यांत भरली. पण नियतीची चक्रे पुन्हा उलटी फिरली आणि रानू पुन्हा पूर्वीच्या आयुष्यात परतली. होय, सध्या रानू आर्थिक संकटाचा सामना करतेय. कोरोना महामारीच्या काळात तिच्या आयुष्याची आर्थिक घडी पुन्हा बिघडली. सध्या तिच्याकडे काहीही काम नाही आणि यामुळे ती चिंतीत आहे.

 न्यूज18 ने दिलेल्या वृत्तानुसार, करोना माहामारीच्या काळात सर्वांनाच आर्थिक फटका बसला. रानू मंडलही त्यापैकीच एक. गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईत तिला काम मिळालेले नाही. स्टेज शो व गाण्याचे कार्यक्रमदेखील मिळालेले नाही. लोकप्रिय झाल्यानंतर रानू एका नव्या घरात शिफ्ट झाली होती. मात्र आता परिस्थितीमुळे पुन्हा एकदा आपल्या जुन्या घरात परतावे लागले आहे. आर्थिकदृष्ट्या कोणताही आधार नसल्याने रानू चिंतीत आहे.

अचानक प्रकाशझोतात आल्यानंतर रानूच्या उद्धटपणाचे किस्सेही चर्चेत होते. तिच्या उद्धटपणाचे अनेक किस्से मध्यंतरी ऐकायला मिळाले होते. तिचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. या व्हिडीओत रानू मंडल एका चाहतीवर रागावल्याचे दिसले होते.‘डोन्ट टच मी, आय एम सेलिब्रेटी नाऊ’, असे चाहतीला तिने सुनावले होते. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर  रानू मंडलच्या डोक्यात हवा गेल्याची चर्चा सुरू झाली होती. सोशल मीडिया युजर्सनीही यावरून तिच्यावर टीका केली होती.

 मीडियालाही ती अ‍ॅटिट्यूड दाखवताना दिसली होती. याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता.नेमका हाच उद्धटपणा, हेच वाटणे रानूच्या स्टारडमला घातक ठरले आणि चाहत्यांनी तिच्याकडे पाठ फिरवल्याचे बोलले जातेय. आता रानूकडे काहीही काम नाही. काम नसल्याने रानू मीडियासमोर येण्यास टाळतेय. अशात पुन्हा एखादा हिमेश रेशमिया रानूला मदतीचा हात देतो का, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

चक्क मीडियालाच अ‍ॅटिट्यूड दाखवू लागली रानू मंडल, विश्वास बसत नसेल तर पाहा हा नवा व्हिडीओ

 रानू मंडलच्या डोक्यात गेली हवा, चाहतीलाच फटकारले म्हणाली Don't touch .... I'm celebrity now !

टॅग्स :राणू मंडल