-रवींद्र मोरेएखाद्या सामान्य व्यक्तीला रातोरात ‘इंटरनेट स्टार’ बनविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे राणू मंडल. लता मंगेशकर यांचे गाणे ‘एक प्यार का नगमा’ गात राणू लाइमलाइटमध्ये आली. याचाच परिणाम हिमेश रेशमियाने तिला आपल्या चित्रपटाच गाण्याची संधी दिली. राणू मंडलच्या अगोदरही असे काहीजण आहेत जे सोशल मीडियाद्वारा हिट झाले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबाबत...* प्रिया प्रकाश वारियर
२६ सेकंदाच्या एका व्हिडीओमध्ये प्रिया प्रकाशचे एक्सप्रेशन्सने लोकांना असे प्रभावित केले की ती पाहतापाहता व्हायरल सेन्सेशन बनली. प्रिया मल्याळम अॅक्ट्रेस आणि मॉडल आहे. प्रियाचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता तो तिचा डेब्यू चित्रपट ‘उरु अदार लव’ याचे गाणे होते. लवकरच प्रिया बॉलिवूड ‘श्रीदेवी बंगलो’ चित्रपटातद्वारा दिसणार आहे.* संजीव श्रीवास्तव
'डांसिंग अंकल' च्या नावाने प्रसिद्ध झालेले संजीव श्रीवास्तव यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की, एका व्हिडीओद्वारा ते रातोरात स्टार बनतिल. त्यांच्या पॉप्युलॅरिटीचा अंदाज याद्वारे लावला जाऊ शकतो की जेव्हा सलमान खाननेही त्यांची भेट घेतली. एवढेच नव्हे तर गोविंदाच्या स्टाइलमध्ये डान्स करणारे डान्सिंग अंकलला स्वत: गोविंदा आणि सुनील शेट्टीदेखील भेटले.* ढिंचॅक पूजा
इंटरनेटवर व्हायरल सेन्सेशन कसे बनावे याचे उदाहरण आहे ढिंचॅक पूजा. ‘सेल्फी मैंने ले ली आज’ हे गाणे यूट्यूबवर व्हायरल होताच ती आॅनलाइन सेलिब्रिटी बनली. शिवाय ‘दिलों का शूटर’ आणि ‘आफरिन बेवफा’ यासारख्या गाण्यांचीही त्यात भर पडली. पूजाची लोकप्रियता एवढी वाढली की, एका सुप्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये तिला सहभागी होण्याची संधी मिळाली.* साशा छेत्री
एका टेलिकॉम कंपनीने जेव्हा आपली आली 4जी सेवा लॉन्च केली तेव्हा एक मुलगी संबंधीत जाहिरातीत दिसली. त्या कंपनीने टीव्हीपासून ते न्यूजपेपरपर्यंत एवढ्या जाहिराती दिल्या की दिवसात कमीत कमी पाच लोकांना कोणत्याना कोणत्या प्रकारे या मुलीचे दर्शन होत होते. कॅँपेन लॉन्च होण्याच्या आठवड्याभरातच ही मुलगी सेन्सेशन बनली. तिचे नाव साशा छत्री आहे आणि ती डेहराडूनची राहणारी आहे.* साइमा हुसैन मीर
पुण्यात ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान शाहरुखने आपल्या चाहत्यांसोबत सेल्फी घेतली होती. या सेल्फीला जेव्हा शाहरुखने सोशल मीडियावर पोस्ट केली तर एका मुलीची चर्चा खूपच होऊ लागली होती. या मुलीचे नाव साइमा हुसैन आहे आणि ही काश्मीरची आहे.* कुसुम श्रेष्ठा
नेपाळच्या या भाजीवालीचाा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, हॅशटॅग #Tarkariwali आणि #Sabjiwali टॉप ट्रेंड बनला. हा फोटो जेव्हा काढण्यात आला तेव्हा ती कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या घरी आली होती आणि आपल्या आईवडिलांची मदत करण्यासाठी ती भाजीपाला विकायला निघाली होती.