दीपवीर लग्नानंतर देखील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. लग्नानंतर दोन महिने उलटून गेले तरी ते कोणत्याना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. लग्नानंतर दीपिकाने दिलेल्या पहिल्या मुलाखतीत तिला, लग्नानंतर तुला दीपिका पादुकोण असेच म्हणायचे की, दीपिका पादुकोण सिंग भवनानी, अशी तुझी ओळख करून द्यायची? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर दीपिकाने मोठे मजेशीर उत्तर दिले. मी आहे, दीपिका पादुकोण, वाईफ आॅफ रणवीर सिंग पादुकोण, असे दीपिका म्हणाली. दीपिकाच्या या उत्तरावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाच्या प्रेमात अकांठ बुडालेल्या रणवीरने दीपिकासाठी नाव बदलण्याची देखील तयारी दर्शवली आहे.
मस्तानीच्या प्रेमात वेडा झाला बाजीराव, दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 8:05 PM
दीपवीर लग्नानंतर देखील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. लग्नानंतर दोन महिने उलटून गेले तरी ते कोणत्याना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात.
ठळक मुद्देदीपिकाच्या प्रेमात अकांठ बुडालेल्या रणवीरने दीपिकासाठी नाव बदलण्याची देखील तयारी दर्शवली आहेदीपिकाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले