Join us

रणवीर-दीपिका जाणार सिक्रेट व्हॅकेशन्सवर...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 7:11 PM

‘पद्मावती’ची शूटिंग सुरू झाली तसे रणवीर आणि दीपिका चित्रिकरणात एवढे व्यस्त झाले की, चाहत्यांना प्रश्न पडला हे लव्हबर्ड्स नेमके ...

‘पद्मावती’ची शूटिंग सुरू झाली तसे रणवीर आणि दीपिका चित्रिकरणात एवढे व्यस्त झाले की, चाहत्यांना प्रश्न पडला हे लव्हबर्ड्स नेमके कुठे गायब झाले? कारण चित्रिकरणासोबतच ते आणखी एका गोष्टीमध्ये प्रचंड बिझी होते. कुठली ठाऊक आहे का? न्यू इअर साठीची सिक्रेट प्लॅनिंग. ते लवकरच एका अज्ञात ठिकाणी कुणालाही न सांगता न्यू इअर सेलिब्रेशन करणार आहेत. रणवीर-दीपिकाने सार्वजनिक ठिकाणी कधीही त्यांचं नातं मान्य केलं नाही. पण, कार्यक्रम, सोहळे, पार्टी, प्रमोशनवेळी त्यांची जवळीक काही माध्यमांपासून लपून राहिलीय का? ‘रामलीला’,‘बाजीराव मस्तानी’ नंतर आता ‘पद्मावती’ चित्रपटात रणवीर आणि दीपिका एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. नुकतेच त्यांनी ‘पद्मावती’ चे पहिले शेड्यूल पूर्ण केले असून दुसरे शेड्यूल ३ जानेवारी २०१७ ला सुरू होणार आहे. त्यामुळे दुसरे शेड्यूल सुरू होण्याअगोदरच हे लव्हबर्ड्स कामातून ब्रेक घेऊन न्यू इअर सेलिब्रेशनसाठी सिक्रेट व्हॅकेशनवर जाणार आहेत. जानेवारी हा महिना दीपिका पादुकोणसाठी खुप बिझी असणार आहे. हॉलिवूड डेब्यू चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ २० जानेवारीला रिलीज होणार असल्याने तिला प्रमोशनसाठीही विन डिजेलसोबत फिरावे लागणार आहे. तसेच रणवीर देखील त्याच्या आगामी शेड्यूलमध्ये बिझी होण्याअगोदर थोडासा निवांत वेळ खर्च करू इच्छितो. त्यामुळे त्या दोघांनी हा प्लॅन बनवला आहे. न्यू इअरचे प्लॅनिंग तर सर्वच जण करत आहेत. मग तुम्हीच का करू नये? रणवीर -दीपिका हॅप्पी न्यू इअर टू यू बोथ....!