दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे दीपवीर यांच्या मुंबईतील लग्नाच्या रिसेप्शनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला अनेक लाईक्स मिळाले आहेत. हे रिसेप्शन केवळ बॉलिवूड आणि इंडस्ट्रीच्या संबंधित व्यक्तींसाठीच खास ठेवण्यात आले होते. त्यामुळे या रिसेप्शनला बॉलिवूडच्या सर्व तारे-तारकांनी हजेरी लावल्याचे दिसतेय. यावेळी दीप-वीर यांचा अंदाज खूपच मोहात पाडणारा होता. त्यांचे चाहते पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमात घायाळ झाले नसतील तरच नवल!
दीपिका रणवीर यांच्या रिसेप्शनची चर्चा अद्यापही थांबली नाही. रिसेप्शनमध्ये दीपवीर दोघेही एकमेकांना मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसले. दीपवीरचा रॉयल अंदाज चर्चेचा विषय ठरला. विशेषत: दीपिकाने तर सगळ्यांनाच घायाळ केले. दीपिकाचा लूक हा एखादी अप्सरा अवतरली असाच होता. दीपिकाने अबु जानी आणि संदीप खोसलाने डिझाईन केलेला आऊटफिट कॅरी केला होता तर रणवीरने घातलेली शेरवानी डिझाईनर रोहित बलने डिझाईन केली होती. त्यांच्या या रिसेप्शनची चर्चा त्यांच्या कपड्यांमुळे रंगली आहे. पण त्याचसोबतच मुंबईतील रिसेप्शनला काय काय खायला होते याची देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या रिसेप्शनला शाहरूख खान, सैफ अली खान, करिना कपूर खान, शिल्पा शेट्टी, सारा अली खान, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, जुही चावला अशी सगळी बॉलिवूडच्या मंडळींनी या रिसेप्शनला हजेरी लावली होती.
मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये हे रिसेप्शन देण्यात आले होते. हे रिसेप्शन खास दीपिका आणि रणवीर यांच्या कुटुंबियांसाठी आणि मीडियासाठी आयोजित करण्यात आले होते. मीडियातील अनेक मंडळींनी त्यांच्या रिसेप्शनला जाऊन शुभेच्छा दिल्या. या रिसेप्शनला खूप साऱ्या खाण्याचे पदार्थ ठेवण्यात आले होते. तसेच अनेक गोड पदार्थांची देखील रिसेप्शनला रेलचेल होती. प्रसिद्ध फोटोग्राफर व्हायरल भयानीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून दीपिका आणि रणवीरच्या रिसेप्शनला खाण्यासाठी काय काय होते हे सगळ्यांना सांगितले आहे. गाजरच्या हलव्यापासून, चॉकलेट, केक, रस मलाई, रसगुल्ला यांसारखे अनेक पदार्थ आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळत आहेत.