ठळक मुद्देकाल २४ नोव्हेंबरला रणवीरची बहीण रितिका भवनानी हिने दीपवीरसाठी खास डिनर पार्टी अरेंज केली होती. या पार्टीत रणवीरने सगळ्यांदेखत दीपिकाला जगातील सगळ्यांत सुंदर मुलगी म्हटले.
दीपिका पादुकोणशी लग्न झाल्यापासून रणवीर सिंग अगदी हवेत आहे. होय, याचे कारण म्हणजे, जगातील सगळ्यांत सुंदर मुलीशी त्याचे लग्न झालेय. अर्थात हे आम्ही नाही तर स्वत: रणवीर सगळ्यांना सांगत सुटला आहे. काल २४ नोव्हेंबरला रणवीरची बहीण रितिका भवनानी हिने दीपवीरसाठी खास डिनर पार्टी अरेंज केली होती. या पार्टीत रणवीरने सगळ्यांदेखत दीपिकाला जगातील सगळ्यांत सुंदर मुलगी म्हटले.
मी जगातील सगळ्यांत सुंदर मुलीशी लग्न केले आहे, असे तो स्टेजवर चढल्या चढल्या म्हणाला. केवळ इतकेच नाही तर भविष्यात जे काही पुढे येईल, ते तू आणि मी सोबत जगू...असेही तो म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून दीपिका लाजून लाजूर चूर झाली नसेल तर नवल. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. या पार्टीत रणवीर सिंग आणि दीपिकाने धम्माल डान्स केला.
या पार्टीत दीपिका पुन्हा एकदा सब्यसाने डिझाईन केलेल्या आऊटफिटमध्ये दिसली. तर रणवीर मनीष अरोराने डिझाईन केलेल्या आऊटफिटमध्ये. दोघांचाही पार्टीतील अंदाज पाहण्यासारखा होता.या पार्टीनंतर येत्या २८ नोव्हेंबरला दीपवीरचे मुंबईतचं ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनमध्ये केवळ बॉलिवूडचे मंडळी दिसतील. मुंबईचे रिसेप्शन आटपल्यानंतर दीपवीर पुन्हाआपल्या कामाला लागणार आहेत. रणवीर सिंगचा सिम्बा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून रणवीर या चित्रपटाच्या प्रमोशनला डिसेंबरमध्ये सुरुवात करणार आहे तर दीपिका मेघना गुलजारच्या आगामी चित्रपटावर काम करणार आहे. अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या लक्ष्मीवर आधारित चित्रपट मेघना दिग्दर्शित करत असून त्यात दीपिका मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ती मार्चमध्ये सुरुवात करणार असल्याचे कळतेय. गत १४-१५ नोव्हेंबरला दीपवीरने सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. इटलीच्या लेक कोमो येथे हा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे अनेक फोटो दीपवीरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.