रणवीर-दीपिकाच्या नात्यात शाहिद का बनतोय ‘हड्डी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2016 11:34 AM
बॉलीवूडचे हॉटेस्ट आणि बोल्ड कपल रणवीर सिंग व दीपिका पदुकोन यांच्या नात्यात आता सगळेच ‘आॅल इज वेल’ नसल्याची चिन्हे ...
बॉलीवूडचे हॉटेस्ट आणि बोल्ड कपल रणवीर सिंग व दीपिका पदुकोन यांच्या नात्यात आता सगळेच ‘आॅल इज वेल’ नसल्याची चिन्हे दिसत आहेत. दोघांमध्ये वाढत असलेल्या दुराव्याला कोणीतरी तिसरा जबाबदार असल्याचे म्हटले जातेय. तो इतर कोणी नसून शाहिद कपूर आहे.शाहिद आणि दीपिकामधील वाढणारी जवळीकता रणवीरला खटकत आहे. त्याचे झाले असे की, दीपिकाने आग्रह करून शाहिदला ‘पद्ममावती’मध्ये घेण्याची विनंती केली. संजय लीला भंसाळी दिग्दर्शित या सिनेमात रणवीरचीसुद्धा भूमिका आहे. परंतु पटकथेनुसार शाहिद आणि दीपिकाचा आॅन स्क्रीन वेळ जास्त असून दोघांचे इंटिमेट सीन्ससुद्धा आहेत.हीच गोष्ट रणवीरला खटकत आहे. शिवाय दीपिकाने चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये केवळ ती आणि शाहिद असावे अशी मागणी केल्यामुळे तर तो चांगलाच संतापला. ती शाहिदची एवढी बाजू का घेतेय हेच त्याला कळेना. तिचे असे वागणे पाहून इंडस्ट्रीतील लोकसुद्धा चकित झाले आहेत. ‘हड्डी’ : शाहिद - दीपिकानुकतेच रिलीज झालेल्या ‘ट्रीपल एक्स’ ट्रेलरची शाहिदने सोशल मीडियावर तोंडभरून कौतुक केले. त्यावर दीपिकाने त्याला ‘किस’च्या इमोजी पाठवून धन्यवाद केले. असे असेल तर रणवीरला वाईट वाटणे स्वभाविक आहे.