दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नासाठी झाले इटलीला रवाना... पाहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 12:13 PM2018-11-10T12:13:15+5:302018-11-10T12:19:45+5:30
दीपिका आणि रणवीर दोघे एअरपोर्टला एकत्र न जाता वेगवेगळे गेले. पण विशेष म्हणजे दोघांनीही यावेळी पांढरे कपडे परिधान केले होते. या दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून ते दोघे किती खूश आहेत याचा अंदाज येत होता.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या लग्नाची बातमी नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या फॅन्सना दिली आहे. १४ आणि १५ नोव्हेंबर या दिवशी त्यांचे लग्न होणार आहे. त्यांचे लग्न इटली मध्ये होणार असून इटलीला जायला ते दोघे नुकतेच रवाना झाले आहेत. त्या दोघांना मुंबई एअरपोर्टवर पाहाण्यात आले.
दीपिका आणि रणवीर दोघे एअरपोर्टला एकत्र न जाता वेगवेगळे गेले. पण विशेष म्हणजे दोघांनीही यावेळी पांढरे कपडे परिधान केले होते. या दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून ते दोघे किती खूश आहेत याचा अंदाज येत होता. रणवीरसोबत त्याचे आई वडील आणि त्याची मोठी बहीण दिसत होती. यावेळी त्याने फोटोग्राफर्सना फोटोसाठी पोझ दिले. तसेच फॅन्सशी हस्तांदोलन केले. त्यांच्यासोबत सेल्फी देखील काढले तर दुसरीकडे दीपिका कोणाशीही न बोलता शांतपणे एअरपोर्टच्या आत निघून गेली. दीपिका यावेळी पांढऱ्या स्कर्ट आणि टॉपमध्ये खूपच छान दिसत होती.
दीपिका आणि रणवीर यांचे लग्न जरी इटलीला होत असले तरी लग्नाच्या आधी करावयाचे अनेक विधी दीपिका आणि रणवीर यांनी भारतातच केले आहे. दीपिकाच्या बंगलूरुच्या घरी नुकतीच नंदी पूजा झाली तर रणवीरच्या घरी हळदीचा कार्यक्रम झाला.
गेल्या महिन्यात म्हणजेच २१ आॅक्टोबरला खुद्द दीपिका आणि रणवीरने आपल्या लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली. ‘आमच्या कुटुंबाच्या आशीर्वादाने आमचे लग्न १४ व १५ नोव्हेंबर २०१८ रोजी होत आहे. आमच्या या सुंदर प्रवासासाठी आपल्या आशीर्वादाची कामना करतो,’असे दीपिका व रणवीरने सोशल मीडियावर केलेल्या लग्नाच्या घोषणेत म्हटले आहे.
रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला-रामलीला चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती. अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मीडियासमोर मान्य केलेले नव्हते. त्यानंतर त्या दोघांनी बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.