Join us

​ रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचे नाते होणार जगजाहिर! कुठल्याही क्षणी करू शकतात अधिकृत घोषणा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 4:45 AM

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या लव्हबर्ड्सचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही. एकत्र काम करता करता रणवीर दीपिका कधी ...

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या लव्हबर्ड्सचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही. एकत्र काम करता करता रणवीर दीपिका कधी एकमेकांत अडकले, ते कुणालाच कळले नाही. दीर्घकाळापासून या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा होतेय. पण रणवीर किंवा दीपिका या दोघांनी कधीही अधिकृतपणे हे नाते मान्य केले नाही. मध्यंतरी हे कपल साखरपुडा करणार अशीही खबर आली. पण साखरपुड्याची बातमीही खोटी ठरली. पण कदाचित आता योग्य वेळ आली आहे. होय, दीपिका व रणवीरच्या अतिशय जवळच्या सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर या कपलने आपले नाते जगासमोर मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात कधीही दीपिका व रणवीर आपले नाते सार्वजनिक करू शकतात. कुठल्याही क्षणी मीडियासमोर तशी अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.सूत्रांचे खरे मानाल तर, दीपिका व रणवीर दोघेही ‘पद्मावत’च्या रिलीजच्या प्रतीक्षेत होते. या चित्रपटात दोघांनीही साकारलेल्या संवेदनशील भूमिका बघता, दीपिका व रणवीरने ‘पद्मावत’ रिलीज होईपर्यंत संयम दाखवला. केवळ या चित्रपटामुळे दोघेही अंतर राखून होते. पण आता ‘पद्मावत’ रिलीज झाल्यानंतर दीपिका व रणवीर दोघेही आपले रिअल लाईफ रिलेशन लोकांसमोर मान्य करण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत. एका दिग्दर्शकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजोरा दिला आहे.‘पद्मावत’ रिलीज झाल्यानंतर रणवीर व दीपिका दोघेही मोठा धमाका करू शकतात, असे त्यांनी सांगितले.ALSO READ : ‘पद्मावत’च्या स्क्रिनिंगला हातात हात घालून दिसले लव्हबर्ड्स रणवीर सिंग अन् दीपिका पादुकोण !काल परवा दीपिका व रणवीर दोघेही हातात हात घालून ‘पद्मावत’च्या स्क्रिनिंगला पोहोचले होते. अलीकडे रणवीर व दीपिकाचे पालक एकमेकांना भेटले होते. यामुळे दोघांच्याही लग्नाच्या चर्चेला आणखीच उधाण आले होते. गेल्या काही दिवसांत दीपिकाही रणवीरसोबत मोकळेपणाने फिरताना दिसतेय. ताज्या मुलाखतीत, दीपिका रणवीरसोबतच्या नात्यावर बोलली होती. जेव्हा आम्ही सोबत असतो तेव्हा आम्हाला दुस-या कुणाचीच गरज भासत नाही, असे दीपिका म्हणाली होती. यावरून दोघेही एकमेकांसोबत आनंदी आहेत, हे कळते. कदाचित या भावनांना आणि नात्याला एक अधिकृत नाव देण्याची तयारी रणवीर व दीपिका दोघांनीही केली आहे.