रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण आज इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे लग्नबंधनात अडकणार आहेत. हा लग्नसोहळा अतिशय खाजगी असणार आहे. त्यामुळे लग्नात केवळ ३० पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. इटलीला रवाना झाल्यापासूनच रणवीर आणि दीपिकाच्या कुटुंबीयांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लग्नात कोणतीही कमतरता येऊ नये यासाठी या दोघांच्या कुटुंबातील मंडळी प्रयत्न करत आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण या दोघांनी त्यांच्या लग्नाचा विमा देखील उतरवला आहे. दिल्ली स्थित ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून हा विमा उतरवण्यात आला असल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या मुंबई ऑफिसमधून या विमाचे कामकाज पार पडले असून १२ ते १६ नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधींसाठी हा विमा उतरवण्यात आला आहे. या मध्ये आग लागणे, चोरी होणे, विमानात काही नुकसान होणे, पाण्यापासून नुकसान, चोरी, वादळ, पूर, भुकंप यांसारख्या नैसिर्गिक आपत्तांपासून नुकसान या गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय संप, दंगल यांसारख्या गोष्टींमुळे देखील नुकसान झाल्यास त्याची भरपाई त्यांना मिळणार आहे.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे सहाय्यक जनरल मॅनेजर अनिल श्रीवास्तव यांनी जागरणशी बोलताना सांगितले की, पूर्णपणे लग्नाचा विमा त्यांनी केला आहे असे आपण म्हणू शकत नाही. कारण त्या पॉलिसीमध्ये लग्नाचा विमा कव्हर होत नाही. हा विमा दागिने तसेच लग्नात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर आहे.
दीपिका आणि रणवीरच्या लग्नातील सगळ्याच गोष्टी खूप खास असणार आहेत. लग्नाचा खास केक बनवण्यासाठी स्विर्झलँडवरून शेफना बोलवण्यात आले आहे. तसेच ते लग्नातील काही खास मिठाई देखील बनवणार आहेत.
रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला-रामलीला चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती. अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मीडियासमोर मान्य केलेले नव्हते. त्यानंतर त्या दोघांनी बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले