Join us

'डॉन ३'साठी रणवीर सिंग आणि कियारा आडवाणी थायलंडमध्ये गिरवणार अ‍ॅक्शनचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 2:21 PM

Don 3 Movie : अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यानंतर आता रणवीर सिंग 'डॉन'ची जबाबदारी सांभाळणार आहे. होय. बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून फरहान अख्तरने 'डॉन ३'साठी रणवीरला कास्ट केल्याची बातमी आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यानंतर आता रणवीर सिंग (Ranveer Singh) 'डॉन' (Don Movie)ची जबाबदारी सांभाळणार आहे. होय. बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून फरहान अख्तरने 'डॉन ३'(Don 3 Movie) साठी रणवीरला कास्ट केल्याची बातमी आहे. मग बातमी आली की यावेळी रोमाची भूमिका कियारा आडवाणी करणार आहे. आता एक मोठी अपडेट समोर येत आहे की, रणवीर आणि कियारा पुढील महिन्यात थायलंडमध्ये चित्रपटासाठी ॲक्शनचे प्रशिक्षण घेणार आहेत. 

मिड डेच्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने सांगितले की, 'रणवीर सिंग आणि कियारा आडवाणी मार्चच्या अखेरीस अॅक्शन प्रशिक्षणासह शारीरिक तयारी सुरू करतील. त्यात थायलंडमधील मार्शल आर्ट तज्ज्ञांचा समावेश असेल. वास्तविक, फरहानला चित्रपटातील ॲक्शनची लेवल वाढवायची आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, 'गेल्या काही वर्षांत हिंदी सिनेमाने 'वॉर' (२०१९) पासून 'पठाण' (२०२३) आणि 'फाइटर'पर्यंत सर्व प्रकारच्या ॲक्शन शैली पाहिल्या आहेत. त्यामुळे फरहानला ॲक्शन सिंटॅक्स नव्याने बनवायचे आहे. असेही सांगितले जात आहे की त्याने भारत आणि इतर देशांतील ॲक्शन कोरिओग्राफरसोबत अनेक मिटिंग्स केल्या आहेत. त्याला 'डॉन ३' अलिकडच्या वर्षांत दाखवलेल्या चित्रपटांपेक्षा थोडा वेगळा हवा आहे.

ऑगस्टपासून शूटिंगला होणार सुरूवातयापूर्वी बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले होते की चित्रपट अद्याप कास्टिंगच्या टप्प्यात आहे. 'डॉन ३'चे प्री-प्रॉडक्शन पुढील महिन्यात सुरू होणार आहे. यानंतर टीम यावर्षी ऑगस्ट महिन्यात शूटिंगला सुरुवात करेल. याआधीच्या दोन्ही 'डॉन' चित्रपटांमध्ये अनेक सरप्राईज होते, यावेळीही प्रेक्षकांना अशीच सरप्राईज मिळणार आहेत. 'डॉन 3'चे बजेट खूप जास्त असून हा सर्वात महागडा चित्रपट असेल, असे सांगितले जात आहे. सूत्रांनी सांगितले की, शाहरुख खानसोबत 'डॉन १' आणि 'डॉन २' चांगल्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, परंतु फरहानला 'डॉन ३' जागतिक स्तरावर बनवायचा आहे. त्यामुळे नव्या युगात या फ्रँचायझीसाठी रणवीर सिंगपेक्षा चांगला कोणीही असू शकत नाही.

चित्रपटाचे बजेट असणार २७५ कोटीडॉन ३चे बजेट २७५ कोटी रुपये असेल असे सांगितले जात आहे. या फ्रँचायझीचा पहिला सिनेमा २००६ मध्ये रिलीज झाला होता, जो १९७८ मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ बच्चनच्या 'डॉन'चा रिमेक होता. यानंतर २०११ मध्ये 'डॉन २' रिलीज झाला.

टॅग्स :रणवीर सिंगकियारा अडवाणी