नवी दिल्ली - बॉलिवूडमधील बाजीराव आणि मस्तानीची जोडी नेहमीच लोकांच्या पसंतीस उतरली आहे. दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) अनेकदा त्यांच्या चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. दीपिका आणि रणवीर दोघेही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत असल्याने ते कायम चर्चेत असलेलं कपल आहे. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दीपिका आणि रणवीर दोघेही एकमेकांविषयी नेहमी विविध गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. रणवीरने ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला दीपिकाबद्दल एक प्रश्न विचारला. रणवीरने त्याला मजेशीर उत्तर दिले आहे.
रणवीर सिंग हा सोशल मीडियावर फारच सक्रीय असतो. तो सोशल मीडियावर त्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आपल्या चाहत्यांसोबतही ही तो संवाद साधत असतो. नुकतंच रणवीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने रणवीरला दीपिकाबद्दल एक प्रश्न विचारला. तुला दीपिकाने बनवलेलं जेवण आवडतं का? असा प्रश्न चाहत्याने विचारला. त्यावर त्याने भन्नाट उत्तर दिलं आहे.
"मी तिच्या जेवणाचा खूप मोठा चाहता आहे. मला ती जे काही बनवते ते प्रचंड आवडते. ती एक अप्रतिम कुक आहे. तसेच ती मल्टी टॅलेंटेड आहे" असं रणवीरने म्हटलं आहे. रणवीरने सिंहने हे उत्तर देताना दीपिकाला देखील टॅग केले आहे. दीपिकानेही रणवीरच्या या उत्तराला प्रत्युत्तर दिले आहे. "तू ब्राऊन पॉईंट्स मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे का?" असं दीपिकाने म्हटलं आहे. रणवीरने इतरही अनेक प्रश्नांची उत्तरं ही आपल्या हटके अंदाजात दिली आहे.
दीपिका पादुकोण फिल्मी लाईफसोबतच सोशल मीडियावरही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सध्या दीपिका तिच्या बदलेल्या लूकमुळे चर्चेत होती. दीपिकाचा नवा हेअरकट चर्चेचा विषय ठरला . या नव्या हेअरकटमधील फोटो दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केला आणि चाहते ‘खल्लास’ झाले. केवळ चाहतेच नाही तर दीपिकाचा हबी रणवीर सिंग याची अवस्थाही फार वेगळी नव्हती. दीपिकाचा नवा अवतार पाहून रणवीरने अशी काही प्रतिक्रिया दिली की, त्याच्या कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधले. दीपिकाच्या नव्या हेअरकटवर पती रणवीरने ‘मार दो मुझे’ अशी कमेंट केली होती.