3 वर्षे सगळीकडे काम मागत फिरत होता रणवीर सिंग, असा मिळाला होता पहिला मोठा ब्रेक

By गीतांजली | Published: December 12, 2020 07:00 AM2020-12-12T07:00:00+5:302020-12-12T07:00:02+5:30

'बँड बाजा बारात' सिनेमातून रणवीर सिंगने आपल्या करिअरची सुरुवात केली.

Ranveer singh complete 10 years in bollywood remember struggle days outsider | 3 वर्षे सगळीकडे काम मागत फिरत होता रणवीर सिंग, असा मिळाला होता पहिला मोठा ब्रेक

3 वर्षे सगळीकडे काम मागत फिरत होता रणवीर सिंग, असा मिळाला होता पहिला मोठा ब्रेक

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने सिने इंडस्ट्रीत अलीकडेच दहा वर्षे पूर्ण केली आहेत. 'बँड बाजा बारात' ने आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या रणवीर सिंगने या इंडस्ट्रीत आपलं स्थान मिळवले आहे. आज भलेही रणवीरचे नाव त्याच्या चाहत्यांना ओठांवर असते पण एकवेळी अशी होती जेव्हा त्याला संघर्ष करावा लागला होता. प्रत्येकाला त्याला आपला पोर्टफोलिओ दाखवावा लागत होता. 

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रणवीर सिंगने आपल्या संघर्षाचे दिवसांना उजाळा दिला. त्याच्या मते, तीन वर्षे तो फक्त कामाच्या शोधात फिरला. त्याला कोणताही मोठा ब्रेक मिळत नव्हता. याबद्दल बोलताना तो म्हणाला, मी साडेतीन वर्षे अंधारात होतो. कुठेतरी ब्रेक मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. माझा  पोर्टफोलिओ घेऊन अनेक ऑफिस फिरत होतो. मी एक मोठा अभिनेता होईन, मुख्य भूमिका साकारेन, असं त्यावेळी विचार करणं माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. पण आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी पुढे जात राहिलो.

रणवीरच्या म्हणण्यानुसार त्याने  'बँड बाजा बारात'च्या  माध्यमातून पदार्पण केले, पण तो या सिनेमालाठी पहिला चॉईस नव्हता. दोन वर्षांपूर्वी एका मुलाखतीत रणवीरने सांगितले की, रणबीर कपूरला या सिनेमासाठी घेण्याची तयारी होती. अभिनेत्याने सांगितले, रणबीरने 'बँड बाजा बारात' सिनेमा करायला नकार दिला होता. यशराज फिल्मस नव्या चेहऱ्याच्या शोधत होते. मला कॉल आला आणि मी ही संधी जाऊ दिली नाही. मी कोणतेही मॉडेलिंग किंवा संगीत व्हिडिओ केले नाहीत. पण तरीही  मला हा मोठा ब्रेक मिळाला.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर रणवीर '83'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात तो कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. कोरानामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 

Web Title: Ranveer singh complete 10 years in bollywood remember struggle days outsider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.