दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग कायम चर्चेत आहेत. लग्नानंतर गत २१ नोव्हेंबरला बेंगळुरु येथे दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन झाले. यानंतर काल शनिवारी मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलात रणवीरची बहीण रितिका भवनानी हिने भाऊ आणि वहिनीसाठी एक ग्रँड डिनर पार्टी आयोजित केली होती. तुम्हाला ठाऊक नसेल की, रणवीर आपल्या मोठ्या बहिणीला ‘छोटी माँ’ म्हणतो. या प्रायव्हेट डिनर पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
होय, या पार्टीत रणवीर पुन्हा एकदा आपल्या चिरपरिचित अंदाजात दिसला. पार्टीतील त्याचे लूक बरेच वेगळे आणि कूल होते. या पार्टीसाठी त्याने पिक आणि ब्ल्यू कलरचा लॉन्ग कोट निवडला होता. या कोटवर हार्ट शेप इम्बेलिशमेंट होते. या कोटसोबत रणवीरने ब्लॅक ट्राऊजर कॅरी केला होता. त्याचे हे संपूर्ण लूक ‘पद्मावत’मधील त्याच्या खिल्जी लूकची आठवण करून देणारे ठरले.
या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून रणवीर या चित्रपटाच्या प्रमोशनला डिसेंबरमध्ये सुरुवात करणार आहे तर दीपिका मेघना गुलजारच्या आगामी चित्रपटावर काम करणार आहे.
अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या लक्ष्मीवर आधारित चित्रपट मेघना दिग्दर्शित करत असून त्यात दीपिका मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ती मार्चमध्ये सुरुवात करणार असल्याचे कळतेय. गत १४-१५ नोव्हेंबरला दीपवीरने सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. इटलीच्या लेक कोमो येथे हा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे अनेक फोटो दीपवीरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.