Join us

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत रणवीर सिंग, दीपिका पादुकोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2017 9:06 AM

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी भलेही त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी अद्यापपर्यंत पब्लिकली अ‍ॅक्सेप्ट केले नसले तरी, त्यांच्यातील रिलेशनशिप खूपच ...

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी भलेही त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी अद्यापपर्यंत पब्लिकली अ‍ॅक्सेप्ट केले नसले तरी, त्यांच्यातील रिलेशनशिप खूपच मजबूत आहे, असे म्हणावे लागेल. वृत्तानुसार या दोघांनीही आता त्यांच्यातील नाते खूप पुढे नेले असून, लवकरच ते याविषयी खुलासा करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार हे दोघेही सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी हा निर्णय केवळ ‘पद्मावती’साठी घेतला आहे. काही दिवसांपासून रणवीर त्याच्या टीमसोबत दहिसरमधून ‘पद्मावती’च्या शूटिंगच्या सेटवर पोहोचत आहे. चित्रपटाचा सेट दोघांच्याही घरापासून खूपच दूर असल्याने वेळ वाचविण्यासाठी रणवीर आणि दीपिका दहिसरमध्ये राहात आहेत. रोजच्या त्यांच्या येण्या-जाण्यामुळे ही बाब समोर आली असून, दोघेही या घरात राहात असल्याचे स्पष्ट झाले आहे. डेक्क क्रॉनिकल रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार दोघेही या घरात लिव्ह इनमध्ये राहात आहेत. दोघे एकत्र राहू लागल्याने त्यांच्यातील नाते आणखीच घट्ट होताना बघावयास मिळत आहे. दोघेही संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाचा मुख्य भाग आहेत. आतापर्यंत या दोघांनी केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम लाभले आहे. पडद्यावरील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आकर्षित करणारी असल्याने त्यांच्या ‘पद्मावती’ची आता त्यांच्या चाहत्यांना आतुरता लागली आहे. त्यातच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी कथेपासून ते पात्रांपर्यंतची माहिती गोपनीय ठेवल्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत जात आहे. हा चित्रपट भन्साळी प्रॉडक्शन हाउसअंतर्गत बनविला जात आहे. हा चित्रपट १७ नोव्हेंबर २०१७ रोजी रिलीज केला जाणार आहे. ‘पद्मावती’च्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार असून, अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत रणवीर असणार आहे. याव्यतिरिक्त रवल रतन सिंग यांच्या भूमिकेत शाहिद कपूर झळकणार आहे. आदिती राव हैदरी हिला अल्लाउद्दीन खिलजीची बेगम दाखविण्यात येणार आहे. तिसºयांदा संजय लीला भन्साळी दीपिका आणि रणवीरला घेऊन चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. हा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवºयात अडकला आहे.