Join us

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची प्रेमकथा सांगितली रणवीरने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 12:33 PM

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या प्रेमकथेविषयी तितकीशी कल्पना कोणालाच नाहीये. पण रणवीर सिंगची मुलाखत फिल्मफेअरच्या डिसेंबरच्या अंकात छापून येणार असून या मुलाखतीच्या दरम्यान त्याने त्यांच्या नात्याविषयी अनेक गुपितं सांगितली आहेत.

ठळक मुद्देरणवीर सिंगने या मुलाखतीच्या दरम्यान सांगितले की, मी आणि दीपिका गेली सहा वर्षं रिलेशनशिपमध्ये आहोत. सहा महिन्यांच्या नात्यानंतरच दीपिकाच माझी जोडीदार म्हणून योग्य असल्याची मला जाणीव झाली होती. गेल्या तीन वर्षांपासून मी लग्न करण्याचा विचार करत होतो. पण केवळ दीपिकाच्या होकाराची मी वाट पाहात होतो. तिने होकार दिल्यानंतर लगेचच लग्न करायचे असे मी ठरवले होते. 

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न नुकतेच इटलीत झाले. इटलीतील लेक कोमा या ठिकाणाची त्यांनी लग्न करण्यासाठी निवड केली होती. रणवीर आणि दीपिकाने केवळ त्यांच्या जवळच्या नातलगांच्या आणि मित्रमैत्रिणीच्या उपस्थितीत लग्न केलं. हे लग्न अतिशय थाटामाटात झाले. दीपिका आणि रणवीर हे नात्यात असल्याची गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चा आहे. पण या दोघांनीही आपल्या नात्याविषयी मीडियात न बोलणेच पसंत केले होते. त्यामुळे या दोघांच्या प्रेमकथेविषयी तितकीशी कल्पना कोणालाच नाहीये. पण रणवीर सिंगची मुलाखत फिल्मफेअरच्या डिसेंबरच्या अंकात छापून येणार असून या मुलाखतीच्या दरम्यान त्याने त्यांच्या नात्याविषयी अनेक गुपितं सांगितली आहेत. तसेच या मासिकासाठी तिने खास फोटोशूटदेखील केले आहे. 

रणवीर सिंगने या मुलाखतीच्या दरम्यान सांगितले की, मी आणि दीपिका गेली सहा वर्षं रिलेशनशिपमध्ये आहोत. सहा महिन्यांच्या नात्यानंतरच दीपिकाच माझी जोडीदार म्हणून योग्य असल्याची मला जाणीव झाली होती. त्यामुळे तिच्याशीच लग्न करायचे असे मी ठरवले होते. गेल्या तीन वर्षांपासून मी लग्न करण्याचा विचार करत होतो. पण केवळ दीपिकाच्या होकाराची मी वाट पाहात होतो. तिने होकार दिल्यानंतर लगेचच लग्न करायचे असे मी ठरवले होते. 

रणवीर आणि दीपिका यांनी भारतात लग्न न करता इटलीमध्ये लग्न केले. त्यांनी लग्न करण्यासाठी इटलीचीच निवड का केली याविषयी देखील रणवीरने सांगितले आहे. तो सांगतो, दीपिकाने लग्नासाठी अनेक स्वप्न रंगवली होती. त्यामुळे तिला जे हवे तेच मी केले. दीपिकाच्या आनंदातच माझा आनंद असल्याने मी इटलीत लग्न करण्याचे ठरवले. 

रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाला प्रचंड सुरक्षा ठेवण्यात आली होती. लग्नातील कोणत्याही पाहुण्याला लग्न विधी अथवा लग्न परिसरातील कोणताही फोटो अथवा व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती. कोंकणी आणि सिंधी अशा दोन पद्धतीने त्यांनी लग्न केले. सिंधी पद्धतीने लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी दीपिका आणि रणवीने त्यांच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या लग्नाचे काही फोटो पोस्ट केले होते. हे फोटो त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडले होते. 

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोणदीप- वीर