'ही' भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंग आहे एक्साइडेट, क्रिकेटचा देव देणार रणवीरला धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 09:00 PM2018-12-25T21:00:00+5:302018-12-25T21:00:00+5:30
रणवीर सिंग लग्नानंतर पुन्हा एकदा कामावर परतला आहे. लवकरच तो '८३' सिनेमाच्या तयारी लागला आहे. '८३' या १९८३ मध्ये भारताने मिळवलेल्या वर्ल्ड कपवर आधारित सिनेमा असणार आहे.
रणवीर सिंग लग्नानंतर पुन्हा एकदा कामावर परतला आहे. लवकरच तो '८३' सिनेमाच्या तयारी लागला आहे. '८३' या १९८३ मध्ये भारताने मिळवलेल्या वर्ल्ड कपवर आधारित सिनेमा असणार आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांनीच भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे.
रिपोर्ट्सनुसार पुढच्या वर्षी कपिल देव रणवीर सिंगला क्रिकेटचे ट्रेनिंग देणार आहे. रणवीर कपिल देव यांना आदर्श मानतो आणि त्यामुळे तो ही भूमिका साकारतोय. ही भूमिका साकारणं त्याच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रणवीर सिंगने या प्रोजेक्टसाठी तयार नव्हता अनेक विणवण्या केल्यानंतर तो यासाठी तयार झाला. हा चित्रपट १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. रणवीरने याविषयी याआधी या चित्रपटात काम करणे हा आपला सम्मान असल्याचे सांगितले आहे.
रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत कॅटरिना कैफ दिसणार आहे. पहिल्यांदाच रणीवर कॅटरिनासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. यांची पत्नी रोमी देवची भूमिका साकारणार आहे. असे म्हटले जाते की, कपिल देव यांच्या यशात त्यांची पत्नी रोमीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यामुळे कॅटरिनाला रोमी यांची भूमिका साकारणे खूपच आव्हानात्मक असणार आहे. रणवीर सिंग या भूमिकेसाठी क्रिकेटचे धडे खुद्द कपिल देव यांच्याकडूनच घेणार आहे. रणवीर सिंगने फारच कमी कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये अभिनयाची जोरदार बॅटिंग केली असून आता '८३' चित्रपटामध्ये काय कमाल दाखवणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.