रणवीर सिंगने अशा अनोख्या स्टाईलमध्ये व्यक्त केले दीपिका पादुकोणवरचे प्रेम!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 9:18 AM
दीपिकावरचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी रणवीर सोडत नाही. अलीकडेही रणवीरने अशीच एक संधी साधली.
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत की नाहीत, याचा अंदाज लावणे कठीण आहे. अचानक रणवीर व दीपिकाच्या ब्रेकअपच्या बातम्या येतात आणि तेवढ्याच अचानक दोघेही एकत्र दिसतात. तसेही दीपिकावरचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी रणवीर सोडत नाही. अलीकडेही रणवीरने अशीच एक संधी साधली. अगदी अनोख्या स्टाईलमध्ये त्याने दीपिकावरचे प्रेम व्यक्त केले. विशेष म्हणजे, दीपिकालाही रणवीरचा हा अंदाज इतका भावला की, ती त्यापुढे नि:शब्द झाली. अलीकडे दीपिका ‘पद्मावती’च्या प्रमोशनसाठी एका टीव्ही शोमध्ये आली होती. याचदरम्यान दीपिकाला सरप्राईज देण्यासाठी रणवीरचा हा संदेश तिच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. हा व्हिडिओ संदेश रणवीरने त्याच्या सोशल अकाऊंटवरही शेअर केला आहे. यात रणवीर दीपिकासाठी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा...’ हे अनिल कपूरचे लोकप्रीय गाणे गातांना दिसतोय. गाणे संपल्यानंतर ‘मंदीर में हो एक जलता दिया यानि की आप दीपिका.आपके बारे में क्या कहूँ. जिस तरह से आप करोड़ो की जिन्दगी में उजाला बन कर आई, मेरी जिंदगी में उजाला बन कर आईं. ठीक इसी तरह से आप जगमगाती रहें मेरी यही दुआ है. लव यु गॉड ब्लेस यु,’ असे रणवीर म्हणतोय. रणवीरचा हा अंदाज पाहून दीपिका भावूक झालेली दिसतेय.ALSO READ : OMG!! इंटरनेटवर लिक झाली Padmavati full movie , साडेपाच लाखांवर Views...वाचा संपूर्ण सत्य!एकंदर काय तर रणवीरने पुन्हा एकदा तो दीपिकावर किती प्रेम करतो, हे दाखवून दिलेय. सध्या दीपिका व रणवीर दोघेही ‘पद्मावती’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या हा चित्रपट वादात सापडला आहे. प्रत्यक्षात दीपिका व रणवीर दोघेही एकमेकांवर प्रेम करतात. पण या चित्रपटात मात्र दोघेही एकमेकांचा द्वेष करताना दिसणार आहेत. तूर्तास वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘पद्मावती’ची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आलीय. सध्या रिलीजचा वाद सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात आहे. पण घाबरण्याची गरज नाही, कारण ‘पद्मावती’चे रिलीज कुणीही रोखू शकत नाही. अर्थात असे आम्ही नाही तर चित्रपटाचे कलाकार म्हणताहेत.