बॉलिवूडमधील सर्वात लाडके व लोकप्रिय जोडपे म्हणजे दीपिका पादुकोण व रणवीर सिंग. या दोघांच्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले आहेत. या दोन महिन्यांत दीपिकाच्या येण्याने रणवीरच्या आयुष्यात काय बदल झाले हे जाणून घेण्यास त्यांचे चाहते खूप उत्सुक होते. त्या निमित्ताने एका मुलाखतीत रणवीरला लग्नानंतर दीपिकाने तुझ्या कोणत्या सवयींवर बंदी घातली आहे, असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना दीपिकाने लग्नानंतर मला तीन गोष्टी करण्यास कायमची बंदी घातली असल्याचे सांगितले.
दीपिकाने रणवीरच्या कोणत्या सवयींवर बंदी घातली आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल ना. याबाबत रणवीर म्हणाला की, रात्री उशीरापर्यंत घराबाहेर थांबण्यास दीपिकाने मला सक्त मनाई केली आहे. इतकेच नाही तर उपाशीपोटी घरातून बाहेर पडायचे नाही. त्यामुळे कितीही महत्त्वाचे काम असले तरी उपाशीपोटी घर सोडण्यास तिने बंदी घातली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत फोन कॉल चुकवायचा नाही. कामामुळे तिचा फोन उचलला नाही तर वेळ मिळताच लगेच फोन करायचा असे दीपिकाने मला बजावून ठेवले आहे त्यामुळे तिने सांगितलेल्या गोष्टी मी कटाक्षाने पाळतो.