रणवीर सिंगचा आगामी बहुचर्चित चित्रपट गली बॉय व्हॅलेंटाइन डेला प्रदर्शित झाला असून सिनेप्रेमासाठी पर्वणी ठरणार आहे. रॅपर सिंगरवर आधारीत असलेल्या गली बॉयचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले आहे. या चित्रपटात रणवीरसोबत आलिया भटदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास ८ कोटींची कमाई केली असल्याचे समजते आहे.
गली बॉयने प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान बुकिंगमार्फत खूप चांगले कलेक्शन केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास ८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. यात मुंबई, पुणे व बंगळुरूमध्ये जास्त चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. कोलकाता व दिल्लीमध्ये देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढतो आहे. आजपर्यंत चित्रपटाच्या बुकिंगमध्ये ४० ते ४५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे बजेट ५० कोटी असल्याचे बोलले जात आहे.