Join us

मुलगा हवा की मुलगी ? रणवीर सिंहने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 16:09 IST

रणवीर आणि दीपिका लवकरच आईबाबा होणार आहेत.

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. दीपिका आणि रणवीर लवकरच आई – बाबा होणार आहेत. चाहतेही त्यांच्या येणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत होते. अशाच एका कार्यक्रमात रणवीरने 'मुलगा हवा की मुलगी' यावर आपल्या हटके अंदाजात उत्तर दिलं आहे.

'जयेशभाई जोरदार'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात एका पत्रकाराने रणवीरला प्रश्न केला होता की,'रिअल लाइफमध्ये रणवीरला मुलगा हवा की मुलगी?'' यावर प्रतिक्रिया देताना रणवीर सिंग म्हणाला होता, 'हे तर देवाच्या हातात आहे.  जेव्हा आपण देवळात जातो तेव्हा प्रसाद म्हणून शिरा दिला किंवा लाडू दिले काय, आपण जो प्रसाद मिळेल तो आनंदाने स्विकारतो,नाक मुरडत नाही. हाच तर्क मुलांनाही लागू होतो. देव जे देईल त्याचा मी आनंदानं स्विकार करेन'.

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण 2018 साली लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर ६ वर्षांनी आता ते आईबाबा होणार आहेत. सप्टेंबरमध्ये दीपिका त्यांच्या पहिला मुलाला जन्म देणार आहे. दीपिका-रणवीर आईबाबा होणार असल्यामुळे चाहतेही खूश आहेत. रणवीर आणि दीपिका यांनी अनेक सिनेमांमध्ये देखील एकत्र काम केलं. दीपिकाने स्वतःला बॉलिवूडपर्यंत मर्यादीत न ठेवता हॉलिवूडमध्ये देखील स्वतःची ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर देखील दीपिका कायम सक्रिय असते.

टॅग्स :रणवीर सिंगसेलिब्रिटीबॉलिवूडदीपिका पादुकोण