Join us

मोहालीमध्ये रणवीर सिंग गिरवतोय 'या' गोष्टीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 3:03 PM

कबीर खानच्या 83 सिनेमाची टीम सध्या मोहालीसाठी रवाना झाली आहे. मोहालीमध्ये जवळपास पंधरा दिवस कलाकारांसाठी एक बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे

ठळक मुद्देयात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे१९८३चा विश्वचषक भारतीय क्रिकेट टीमने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता

कबीर खानच्या 83 सिनेमाची टीम सध्या मोहालीसाठी रवाना झाली आहे. मोहालीमध्ये जवळपास पंधरा दिवस कलाकारांसाठी एक बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यात कॅम्पमध्ये कपिल देव, यशपाल शर्मा, मदन लाल आणि अन्य क्रिकेटर सहभागी होणार आहेत. हे महान क्रिकेटर्स क्रिकेटचे प्रशिक्षण या कलाकारांना देणार आहे. या सिनेमात भारतीय विश्वचषक विजयाची कथा रुपेरी पडद्यावर दाखवली जाणार आहे. १९८३चा विश्वचषक भारतीय क्रिकेट टीमने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. 

यात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे. माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे यात दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात मराठी अभिनेता चिराग पाटील त्याचे वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. 

या सिनेमातून कपिल देव यांची मुलगी दिग्दर्शनात पदार्पण करतेय. आमिया या सिनेमाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे.  '८३'ची टीम शूटिंग करिता लंडनसाठी 15 मे रोजी रवाना होणार आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल, २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.  

टॅग्स :रणवीर सिंगकपिल देव