Join us

मेरा माही! एक अभिनयातला तर दुसरा क्रिकेटचा सुपरस्टार! रणवीर सिंगने घेतली महेंद्रसिंग धोनीची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 16:34 IST

अभिनेता रणवीर सिंगने धोनीसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनाही धोनी आवडतो. अभिनेता रणवीर सिंगने धोनीची भेट घेतली आहे. तसेच धोनीसोबतचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  रणबीर सिंग आणि धोनीच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

रणबीर सिंगने धोनीसोबतचे दोन सेल्फी शेअर केले आहेत. एका चित्रात रणवीर धोनीच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत तो धोनीच्या गालाचे किस घेताना दिसत आहे. हे फोटो पोस्ट करुन लिहीलंय की, "मेरा माही. रणबीर सिंगने शेअर केलेल्या फोटोमधील महेंद्र सिंह धोनीचा शानदार लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.  निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये धोनी तर रणबीर सिंगने काळ्या रंगाचं शर्ट परिधान केलं होतं. 

सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत आहे.या फोटोमध्ये धोनी नवीन हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे. तर रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मधील लूकमध्ये रणवीर सिंग आहे. रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो नुकताच 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या चित्रपटात पाहायला मिळाला होता. शिवाय तो फरहान अख्तरच्या 'डॉन 3' मध्ये पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :रणवीर सिंगएम. एस. धोनीसेलिब्रिटी