दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं आहे. काही महिन्यांपूर्वीच दीपिका-रणवीर आईबाबा झाले आहेत. दीपिकाने ८ सप्टेंबरला त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. दीपिका-रणवीरला कन्यारत्नाची प्राप्ती झाली. आता दीपिका-रणवीरची लेक ३ महिन्यांची झाली आहे. नातीसाठी तिच्या आजीने म्हणजेच रणवीरच्या आईने एक खास गोष्ट केली आहे.
दीपिका-रणवीरने लेकीचं नाव दुआ असं ठेवलं आहे. दुआ ३ महिन्यांची होताच रणवीरची आई अंजू भवनानी यांनी नातीसाठी त्यांचे केस दान केले आहेत. याबाबत त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. "Happy 3rd month birthday ling dua...हा खास दिवस प्रेम आणि आशा यासाठी लक्षात ठेवुया. दुआ मोठी होत असल्याचा आनंद साजरा करत आहोत, त्याबरोबरच चांगुलपणा आणि दयाळूपणाची आठवण ठेवुया. या छोट्याशा कृतीमुळे कठीण काळातून जात असलेल्या कोणाला तरी दिलासा आणि आत्मविश्वास मिळेल अशी आशा आहे", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रणवीरच्या आईने नातीसाठी केलेल्या या कृतीचं प्रचंड कौतुक होत आहे. त्यांच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. दरम्यान, रणबीर-दीपिकाने २०१८ मध्ये लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर ६ वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत.