Jayeshbhai Jordaar Twitter Review : रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) ‘जयेशभाई जोरदार’ ( Jayeshbhai Jordaar ) या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. अखेर आज हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज झाला आणि पाठोपाठ चाहत्यांचा रिव्ह्यूही आला. फर्स्ट डे फर्स्ट शो बघणाऱ्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘जयेशभाई जोरदार’चा रिव्ह्यू शेअर केला आहे. ट्विटरवर सध्या याचीच चर्चा आहे.
‘जयेशभाई जोरदार’ हा एक सोशल कॉमेडी ड्रामा आहे. दिव्यांग ठक्करने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. रणवीर सिंग यात गुजराती स्टाईलमध्ये दिसतोय. त्याच्याशिवाय, शालिनी पांडे, बोमन इराणी, रत्ना पाठक शाह आणि अन्य कलाकारांनी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट चाहत्यांना कसा वाटला? तर अनेकांची या चित्रपटानं निराशा केली आहे. ट्विटरवरच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत. काहींना मात्र चित्रपटातील रणवीरचा कॉमिक अंदाज चांगलाच आवडला आहे. काहींनी हा चित्रपट बोरिंग असल्याचं म्हटलं आहे. काहींनी यात काहीही नवेपणा नसल्याचा रिव्ह्यू दिला आहे. याऊलट काही चाहत्यांनी हा चित्रपट एंटरटेनिंग असल्याचं लिहिलं आहे.
पाहु या ट्विटरवरच्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...
अशी आहे कथाजुन्या विचारसरणीचे गावातील सरपंच (बोमन इराणी) आणि त्याच विचारसरणीला पाठींबा देणारी त्याची पत्नी (रत्ना पाठक शाह) यांना नातूच हवा असतो. जयेशभाईची (रणवीर)ची पत्नी गरोदर असते आणि तिला मुलगी होणार असल्याचं डॉक्टर सांगतात. त्यावेळी जयेशभाई मुलीचा जीव वाचवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतो, अशी या चित्रपटाची ढोबळ कथा आहे.