बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगची चिप्सची एक नवी जाहिरात सध्या वादात सापडली आहे. रणवीरची ही जाहिरात प्रसारित झाली आणि ती पाहून सुशांत सिंग राजपूतचे चाहते भडकले. या चाहत्यांनी रणवीरला जबरदस्त ट्रोल करणे सुरु केले. एवढेच नाही तर यानंतर ट्विटरवर #BoycottBingo हा हॅशटॅगही ट्रेंड करू लागला. रणवीरने या जाहिरातीत सुशांतची खिल्ली उडवल्याचा आरोप एसएसआरच्या चाहत्यांनी केला.या जाहिरातीत रणवीर सिंग एक फॅमिली फंक्शन अटेंड करताना दिसतो. यादरम्यान आगे क्या प्लान है, असे सगळे नातेवाईक त्याला विचारू लागतात. या नातेवाईकांना उत्तर देताना रणवीर सायन्सच्या अनेक टर्म्स एका श्वासात बोलतो. सुशांतच्या चाहत्यानी याच एका गोष्टीवर आक्षेप घेतला आहे. जाहिरातीत रणवीरने जाणीवपूर्वक सुशांतची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केल्याचा चाहत्यांचा आरोप आहे. या जाहिरातीत रणवीरने मार्स, फँटम, एलियन अशा शब्दांचा वापर केला आहे.
तू कधीच एसएसआर बनू शकत नाही...
सायन्सच्या टर्म्स एका श्वासात बोलणा-या रणवीरला लोकांनी जबरदस्त ट्रोल केले आहे. तू जोकर आहेस आणि नेहमीच जोकर राहशील. एसएसआरची कॉपी करून तू स्वत:ला ज्ञानी सिद्ध करू शकत नाहीस, अशा शब्दांत एका युजरने रणवीरला ट्रोल केले.
अन्य एका युजरने तर रणवीरचा चांगलाच क्लास घेतला. जाहिरातीत एका श्वासात सायन्सच्या टर्म्स म्हणणे, तुझे काम नाहीच. तुझा हा पोर्शन कोणी डब केला, ते फक्त मला जाणून घ्यायचे आहे. टर्म्समधील एकाही शब्दाचा अर्थ तुला ठाऊक नसणार, याची मला खात्री आहे. माहित असेल तर सांगच, असे आव्हान या युजरने रणवीरला दिले.सुशांत सिंग राजपूतने यावर्षी 14 जूनला कथितरित्या आत्महत्या केली होती. सुशांतला सायन्स या विषयाची प्रचंड आवड होती.
कंपनीने बंद केले लाईक-डिसलाईकचे बटण
जाहिरातीला होत असलेला विरोध बघता संबंधित कंपनीने आपल्या युट्युब चॅनल्सवरील लाईक-डिसलाईकचे आॅप्शन बंद केले. यावरूनही लोकांनी ट्रोल केले.
रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग पुन्हा धमाका करायला तयार, 'सर्कस'च्या शूटिंगला सुरुवात
म्हणून नाव ठेवले ‘सर्कस’...! रोहित शेट्टी व रणवीर सिंगच्या नव्या सिनेमावरून सुरु झाली वेगळीच चर्चा
आरोप खोटे संबंधित जाहिरातीत रणवीर सिंगने सुशांत सिंग राजपूतची खिल्ली उडवल्याचे आरोप संबंधित ब्रँडने फेटाळून लावले आहेत. आमच्या जाहिरातीत सुशांतची खिल्ली उडवली गेलीय, हा आरोप पूर्णत: निराधार आहे. ही जाहिरात जवळपास वर्षभरापूर्वी ऑक्टोबर 2019 मध्येच शूट झाली होती. मात्र कोरोना महामारीमुळे उत्पादन लॉन्च करण्यास विलंब झाल्याने ही जाहिरात यावर्षी प्रसारित केली गेली, असे संबधित ब्रँडच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.