Join us

दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 11:44 AM

दीपिका गरोदर असताना रणवीरने लग्नाचे फोटो डिलीट केल्यामुळे त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू होत्या. रणवीर-दीपिका घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. आता अभिनेत्याने या चर्चांना  पूर्णविराम दिला आहे. 

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. लवकरच दीपिका आणि रणवीर आईबाबा होणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही गुडन्यूज दिली होती. त्यामुळे त्यांचे चाहतेही उत्सुक होते. पण, काही दिवसांपूर्वीच रणवीरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन त्यांच्या लग्नाचे फोटो डिलीट केले होते. दीपिका गरोदर असताना रणवीरने लग्नाचे फोटो डिलीट केल्यामुळे त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू होत्या. रणवीर-दीपिका घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. आता अभिनेत्याने या चर्चांना  पूर्णविराम दिला आहे. 

रणवीरने नुकतीच एका ज्वेलरी ब्रँडच्या इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये रणवीरला त्याच्या आवडत्या ज्वेलरीबद्दल विचारण्यात आलं. या प्रश्नाचं उत्तर देताना रणवीरने दीपिकाने दिलेल्या रिंगबद्दल सांगताना घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. "मला माझ्या पत्नीने लग्नात दिलेली रिंग आवडते. आणि साखरपुड्याची प्लॅटिनम अंगठीही माझी फेव्हरेट आहे", असं म्हणत रणवीरने त्याच्या बोटातील अंगठी दाखवली. 

सोशल मीडियावरुन लग्नाचे फोटो नेमके का हटवले याविषयी रणवीर सिंगच्या टीमकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. "'दीपवीर'मध्ये सारं काही आलबेल असून हा त्यांच्या सोशल मीडिया व्यवस्थापन धोरणाचा भाग आहे. रणवीर सिंगचे २०२३ पूर्वीचे सर्व फोटो आणि पोस्ट या इन्स्टाग्रामवरुन डिलीट न करता, अर्काइव्ह करण्यात आल्या आहेत. यात त्याच्या लग्नाच्या फोटोंचा समावेश आहे. त्यामुळे दीपवीरच्या चाहत्यांना काळजी करण्याचे काहीही कारण नाही," असं सांगण्यात आलं होतं. 

दीपिका आणि रणवीर २०१८मध्ये लग्नबंधनात अडकले. इटलीमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. दीपवीरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नाच्या ५ वर्षांनी आता ते आईबाबा होणार आहेत. 

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोणसेलिब्रिटी