बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सारा अली खान हे सध्या चर्चेत आहेत. ‘सिम्बा’च्या निमित्ताने एक वेगळी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे. येत्या २८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सारा आणि रणवीरची रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. सध्या हे दोघेही चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहेत. मात्र, नुकताच रणवीरने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात त्याने साराची खिल्ली उडवल्याचे दिसतेय. पण, त्याच्या गमतीला खिलाडूपद्धतीने घेऊन सारानेही तसेच मजेशीर उत्तर दिले आहे.
रणवीरच्या मस्तीखोर स्वभावाशी तर सर्व परिचित आहेतच, मात्र साराही काही कमी नाही. सोशल मीडियावर रणवीर आणि साराच्या इन्स्टास्टोरीवरून याचा अंदाज लावता येतो. रणवीरने साराच्या एका फोटोला मजेशीर कॅप्शन देऊन इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यावर सारा गप्प बसणाऱ्यांमध्ये नव्हतीच. तिनेही तिच्या इन्स्टाग्रामवर एक मजेशीर फोटो शेअर करून रणवीरला उत्तर दिले आहे. त्या दोघांच्याही या इन्स्टास्टोरीचे स्क्रिन शॉट व्हायरल झाले आहेत. रणवीर त्याच्या अतरंगी कपड्यांच्या स्टाईलमुळे चर्चेत असतो. नेमका हाच धागा पकडून साराने रणवीरला त्याच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे.
साराने अलीकडे ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. लवकरच तिचा ‘सिम्बा’ रिलीज होतोय. या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. तूर्तास सारा व रणवीर ‘सिम्बा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दुसरीकडे कार्तिकने ‘प्यार का पंचनामा’मधून आपले बॉलिवूड करिअर सुरु केले होते.