रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. रणवीर-दीपिकाकडे आदर्श कपल म्हणूनही पाहिलं जातं. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी रणवीर-दीपिकाने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आज त्यांच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवशी रणवीरने दीपिकासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
रणवीरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन दीपिकाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने बायकोसाठी खास पोस्ट लिहिली आहे. "प्रत्येक दिवस हा बायकोचं कौतुक करण्याचा दिवस असतो. पण, आज दिवस खास आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी दीपिका...आय लव्ह यू", असं रणवीरने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत रणवीर-दीपिकाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नानंतर सहा वर्षांनी रणवीर-दीपिका आईबाबा झाले आहेत. दीपिकाने ८ सप्टेंबरला त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. रणवीर-दीपिकाला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचं नाव दुआ असं ठेवलं आहे.