रणवीर सिंगने खराब केला आलिया भट्टचा लाखोंचा ड्रेस!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 10:08 AM
रणवीर सिंग याच्यापेक्षा दुसरा कुठलाच उर्जावान अभिनेता बॉलिवूड इंडस्ट्रीने पाहिला नसावा. रणवीर कुठेही असो, उत्साहाने तो नुसता सळसळत असतो. ...
रणवीर सिंग याच्यापेक्षा दुसरा कुठलाच उर्जावान अभिनेता बॉलिवूड इंडस्ट्रीने पाहिला नसावा. रणवीर कुठेही असो, उत्साहाने तो नुसता सळसळत असतो. जिथे जाईल तिथे तो उत्साह भरतो. अलीकडे पार पडलेल्या मुलांच्या अवार्ड फंक्शनमध्येही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. विशेष म्हणजे या फंक्शनमध्ये रणवीरसोबत आलिया भट्टही होती. दोघेही स्टेजवर परफॉर्मन्स देणार होते. आता लहान मुलांना समोर पाहून रणवीर त्यांच्याइतकाच लहान झाला नसेल तर नवल. मग काय, बॉलिवूडचा हा बाजीराव मुलांमध्ये भलताच रमला आणि जेल वॉटर घेऊन पोहोचला. केवळ इतकेच नाही तर त्याने आलियावरही हे जेल वॉटर उधळले. अर्थात यामुळे नाराज होण्याऐवजी आलियानेही ते एन्जॉय केले. पण यात एक मात्र झाले. ते म्हणजे, आलियाचा लाखांचा महागडा ड्रेस खराब झाला. ड्रेसवर जेल वॉटर सांडल्याने आलियाने स्टेजवरून उतरणेच बेहत्तर समजले आणि स्टेजवरून उतरून ती थेट आत गेली. लवकरच आलिया भट्ट व रणवीर सिंग एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ‘गल्लीबॉय’ या चित्रपटात हे दोघे एकत्र दिसणार आहे. सध्या आलिया रणबीर कपूरसोबतच्या एका नव्या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.रणवीरचे म्हणाल तर रणवीरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘पद्मावत’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणवीर पहिल्यांदा निगेटीव्ह भूमिकेत आहे. अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत तो दिसणार आहे. खरे तर ही निगेटीव्ह भूमिका स्वीकारू नये, असा सल्ला अनेकांनी रणवीरला दिला होता. पण तरिही रणवीरने ही भूमिका स्वीकारली. यामागचे कारणही रणवीरने अलीकडे एका मुलाखतीत सांगितले होते. तो म्हणाला होता की, भारतीय पे्रक्षक मुळात कलाकारावर नाही तर कलाकाराने साकारलेल्या भूमिकेवर प्रेम करतात. भूमिका आवडली की, ती भूमिका साकारणा-या कलाकाराला प्रेक्षक डोक्यावर घेतात. भारतात याऊलटही घडू शकते का? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. म्हणजे, आज माझी भूमिका आवडली म्हणून लोकांना मी आवडतो. उद्या माझी भूमिका आवडली नाही तर लोक माझाही द्वेष करू लागतील का? मला या प्रश्नाचे उत्तर हवे होते. यासाठीच एकदा तरी निगेटीव्ह भूमिका साकारण्याची माझी इच्छा होती. ही संधी संजय लीला भन्साळींसारख्या दिग्दर्शकासोबत मिळत असेल तर मी ती का घेऊ नये? म्हणूनच मी ही भूमिका स्वीकारली.ALSO READ : २५ जानेवारी! अखेर ‘पद्मावत’ची रिलीज डेट ‘लॉक’; बॉक्सआॅफिसवर रंगणार ‘पद्मावत’ विरूद्ध ‘पॅडमॅन’ मुकाबला!