Join us

तुझ्या नवऱ्याचं दिवाळं निघालं, खरं आहे का? ट्रोलरनं डिवचलं, मिनी माथूरनं सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 1:12 PM

ट्रोलरने ‘83’ या सिनेमावरून मिनी व तिचा पती कबीर खानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देमिनीची पती कबीर खान यांचा ‘83’ हा सिनेमा बनून तयार आहे. मात्र कोरोनामुळे या सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे.

देशात सध्या कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. स्थिती भीषण आहे. मात्र अशाही परिस्थिती सोशल मीडियावरचे ट्रोलर्स अ‍ॅक्टिव्ह आहेत. अशाच एका ट्रोलरने दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) यांची पत्नी व अभिनेत्री मिनी माथूरला (Mini Mathur ) ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण मिनीने या ट्रोलसला असे काही सुनावले की त्याची बोलती बंद झाली.

बॉलिवूडच्या अन्य सेलिब्रिटींप्रमाणे मिनी माथूर सुद्धा कोरोना काळात गरजूंच्या मदतीसाठी प्रयत्न करतेय. सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजूंपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम ती करतेय. तिच्या अशाच एका पोस्टवर रिप्लाय करत एका ट्रोलरने तिला डिवचले.

काय म्हणाला ट्रोलर?

या ट्रोलरने ‘83’ या सिनेमावरून मिनी व तिचा पती कबीर खानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. असे ऐकले की,‘83’ मध्ये पैसा गुंतवून तुझ्या पतीचे दिवाळे निघाले, हे खरं आहे का? असे या ट्रोलरने लिहिले. ट्रोलरच्या या प्रश्नावर मिनीने सणसणीत उत्तर दिले. इतका मोकळा वेळ असेल तर गरजूंची मदत करण्यात घालव, असे मिनीने त्याला सुनावले. मिनीच्या या उत्तरानंतर संबंधित ट्रोलरने त्याची कमेंट डिलीट केली. पण तोपर्यंत त्याचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते.

तुम्हाला ठाऊक आहेच की, मिनीची पती कबीर खान यांचा ‘83’ हा सिनेमा बनून तयार आहे. मात्र कोरोनामुळे या सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. 1983 साली भारताने जिंकल्या क्रिकेट वर्ल्ड कपची विजयगाथा सांगणा-या या सिनेमात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. एकार्थाने हे माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांचे बायोपिक आहे. कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली. आता 4 जून 2021 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  

मिनी आणि कबीर यांची लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे. मिनीचे कबीरसोबत अफेअर असतानाच्या काळात तिने कबीरची भेट तिच्या वडिलांशी घालून दिली होती. पण या भेटीत मिनीने कबीरच्या आडनावाचा उलगडा वडिलांसमोर केला नव्हता. या रहस्यावरुन वर्षभराने पडदा उचलला गेला. कबीर खान मुस्लिम आहे, त्यामुळे लग्नासाठी वडिलांकडून सहजासहजी परवानगी मिळणार नाही, हे मिनीला ठाऊक होते. म्हणून तिने कबीरची भेट मित्र म्हणून वडिलांशी घालून दिली होती. पण यावेळी तिने कबीरच्या आडनावाचा उल्लेख करणे टाळले.  

टॅग्स :८३ सिनेमारणवीर सिंग