Join us  

अनंत अंबानीच्या हळद समारंभात रणवीर सिंहचा लूक पाहिलात का? नेटकऱ्यांनी केली चेष्टा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 11:32 AM

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीचे अनेक फंक्शन्स गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.

सध्या मुकेश अंबानींच्या मुलाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. कालच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची हळद सेरेमनी पार पडली. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. सर्वजण हळदीत अक्षरश: न्हाऊन बाहेर पडले होते. अनन्या पांडे आणि सारा अली खानचा खास बाँड दिसला. मात्र सगळ्यांची नजर रणवीर सिंहवर (Ranveer Singh) खिळली. रणवीरचा नेहमीप्रमाणेच हटके लूक यावेळी पाहायला मिळाला. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीचे अनेक फंक्शन्स गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या समारंभाचे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत. प्रत्येक इव्हेंटला बॉलिवूड कलाकार आवर्जुन हजेरी लावताना दिसत आहेत. हळद समारंभाचे फोटो व्हिडिओ आता समोर आले आहेत. यामध्ये रणवीर सिंहवर सर्वांचीच नजर खिळली. रणवीर पान खाण्याचा आनंद घेतोय. त्याची रिअॅक्शनही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पिवळा कुर्ता आणि पांढरी प्लाझो असा रणवीरचा लूकही खूपच डॅशिंग दिसत आहे.

रणवीरच्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले, 'पान जर अंबानीच्या घरचं असेल तर चांगलंच असणार ना?','दुसरं काहीतरी घालायला हवं होतं प्लाझोच मिळाली का?','भाई हा काय अवतार केलाय, काका दिसतोय','अशी हेअरस्टाईल तर मी शाळेत असताना करायचे' अशा कमेंट्स करत रणवीरची चांगलीच चेष्टा केली आहे. 

टॅग्स :रणवीर सिंगमुकेश अंबानीलग्नसोशल मीडिया