उत्तम अभिनयापेक्षा अतरंगी स्टाईलसाठी ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे रणवीर सिंग (ranveer singh). आज कलाविश्वात रणवीरने त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आघाडीच्या कलाकारांमध्ये त्याचं नाव आवर्जुन घेतलं जातं. मात्र, एकेकाळी स्ट्रगल करत असताना रणवीरला अनेक वाईट अनुभवांचा सामना करावा लागला. यात अलिकडेच त्याला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला आहे.
अलिकडेच रणवीरने मार्राकेश इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यात इटोइले द ओर पुरस्कारादरम्यान त्याने त्याला आलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला.
'एकदा एका निर्मात्यांनी मला कामासंदर्भात बोलावलं होतं. ते मला काम देणार होते. या निर्मात्यांनी एका व्यक्तीकरवी मला एका अंधाऱ्या ठिकाणी बोलावलं. मला बोलावणाऱ्या व्यक्तीने त्यावेळी मला विचित्र प्रश्न विचारला. तू हार्ड वर्कर आहेस की स्मार्ट वर्कर? असा प्रश्न त्याने मला विचारला. त्यावर मी स्वत:ला स्मार्ट समजत नाही. त्यामुळे मी हार्ड वर्कर आहे, असं उत्तर दिलं", असं रणवीर म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "माझं उत्तर ऐकल्यानंतर डार्लिंग जरा स्मार्ट हो, सेक्सी हो, असं त्या व्यक्तीने मला सांगितलं. जवळपास ३ वर्ष मी अशा गोष्टींचा सामना केला. पण, तो एक काळ होता, ज्यामुळे मी आज मिळालेल्या संधीची किंमत समजू शकतोय."
दरम्यान, रणवीरने त्या निर्मात्याचं नाव जाहीर केलं नाही. मात्र, ते या जगात नाही हे आवर्जुन सांगितलं. विशेष म्हणजे कलाविश्वात केवळ अभिनेत्रींनाच कास्टिंग काऊचचा सामना करावा लागलेला नाही. रणवीरसारखेच अनेक इतरही अभिनेत्यांचा यात समावेश आहे. इम्रान नाजिर खान, रविकिशन, आयुषमान खुराना या कलाकारांनीही कास्टिंग काऊचचा सामना केला आहे.