अभिनेता रणवीर सिंग नुकताच भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान टीम इंडियाला चीअर करताना दिसला. त्याने केवळ भारतीय टीमला चीअर केले नाही तर कॉमेंट्रीही केली. अनेक क्रिकेट खेळाडूंसोबत व्हिडिओ आणि सेल्फी घेत धम्माल केली. हे सगळेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. रणवीरनेही यादरम्यानचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले. पण एक फोटो शेअर करणे रणवीरला चांगलेच महागात पडले. हा फोटो होतो, हार्दिक पांड्यासोबतचा. या फोटोला त्याने, Eat. Sleep. Dominate. Repeat. The name is Hardik. Hardik Pandya असे कॅप्शन दिले होते.
‘ARE YOU F'N KIDDING ME???????????1 - It's Eat Sleep CONQUER Repeat2 - Copyright 3 - I am litigious4 - EAT SLEEP DEPOSITION REPEAT ’ असे ट्वीट त्याने केले. आता पॉलच्या या ट्वीटनंतरही तुम्हाला काहीही बोध झाला नसेल तर पुढची बातमी तुम्ही वाचायलाच हवी. त्याचे असे आहे की, हे वाक्य ब्रॉक लेसनरच्या रिंगमधील एण्ट्रीला वापरले जाते. पॉलच्या ट्वीटचा अर्थ काढायचा झाल्यास कदाचित ब्रॉकच्या या वाक्यावर त्याचे कॉपीराइट आहे. पॉलच्या मते, रणवीरने जाणीवपूर्वक या डायलॉगचा वापर केला आहे. आता पॉल खरोखरच रागात बोलला की तो रणवीरची मस्करी करत होता, हे माहित नाही. पण अद्याप रणवीरने त्याच्या या ट्वीटचे उत्तर दिलेले नाही. आता रणवीर या ट्वीटवर काय उत्तर देतो ते बघूच.