Join us

'शोले'मधील इंग्रजांच्या काळातील जेलर बनला रणवीर सिंग, व्हायरल होतोय मजेशीर व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 17:08 IST

रणवीर सिंगचा अतरंगी व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग चित्रपटाशिवाय बऱ्याचदा त्याच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत येत असतो. त्याच्या अतरंगी स्टाईलमुळे सोशल मीडियावर बऱ्याचदा त्याचे फोटो व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा त्याचा अतरंगी अवतार त्याच्या चाहत्यांना पहायला मिळाला.

यावेळी रणवीर बॉलिवूडचा क्लासिक सिनेमा शोलेमध्ये अभिनेते असरानी यांनी साकारलेली जेलरची भूमिका साकारताना दिसला. रणवीरने जेलरच्या गेटअपमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत असरानी यांचे आयकॉनिक डायलॉग 'अंग्रेजो के जमाने के जेलर' बोलताना दिसतो आहे.

रणवीरने हा गेटअप एका जाहिरातीसाठी केला आहे. या व्हिडिओत रणवीर पोलिसांच्या वेशात दिसतो आहे. यामध्ये रणवीरने आपल्या हावभावने अभिनेते असरानी यांच्या शोलेतील जेलरच्या भूमिकेला हूबेहूब कॉपी केलं आहे. अतरंगी भूमिका साकारण्याची रणवीरची पहिली वेळ नाही. यापूर्वी त्याने फ्रेडडी मर्करी व चार्ली चॅप्लिन यांची भूमिकादेखील केली आहे.

रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या तो ८३ चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देवची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर दीपिका पादुकोण त्याची पत्नी रोमी भाटियाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

याशिवाय रणवीर जयेशभाई जोरदार चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री शालिनी पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी रणवीरने आपलं वजन कमी केलं आहे.

त्यामुळे जयेशभाई जोरदार चित्रपटात रणवीरला पाहणं कमालीचं ठरणार आहे.

टॅग्स :रणवीर सिंग८३ सिनेमादीपिका पादुकोणजयेशभाई जोरदार