दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील हॉट कपलपैकी एक आहेत. दीपिका पादुकोणशी लग्न करण्याच्या आधी रणवीर सिंगचे नाव सोनाक्षी सिन्हाशी जोडण्यात आले होते. बीटाऊनमध्ये हिरो-हिरोईनशी एकमेकांशी नाव जोडली जाणं हा काही नवा प्रकार नाही. 2013मध्ये आलेल्या लुटेरे सिनेमाच्यावेळी रणवीर आणि सोनाक्षीचे अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला नाही मात्र प्रेक्षकांना ही जोडी पसंतीस उतरली. दोघांच्या अफेअरची चर्चा आणखी रंगली.
पण मीडिया रिपोर्टनुसार दोघांच्या प्रेमामध्ये सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आले. रणवीरने देखील आपण दोघे फक्त एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगितले. मीडिया रिपोर्टनुसार लुटेरे सिनेमाच्या सेटवर दोघांमधील जवळीक वाढली. मात्र शत्रुघ्न सिन्हा याने हे नातं पसंत नसल्याने सोनाक्षी आणि रणवीरने आपले मार्ग बदलले. सध्या रणवीर सिंग दीपिका पादुकोणसोबत आपली हॅप्पीली मॅरिड लाईफ एन्जॉय करतो आहे.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर रणवीर सिंगने रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. हा एक कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात रणवीरसोबत पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस व वरूण शर्मा दिसणार आहेत. कॉपीराईटच्या भीतीने रोहितने या सिनेमाचे नाव बदलले असे मध्यंतरी चर्चा होती. त्याआधी रणवीर सिंग व रोहित शेट्टी मिळून ‘अंगूर’ नामक सिनेमा बनवणार असल्याची चर्चा होती.