Join us  

रणवीरने दीपिकासोबत पाहिला 'कल्कि २८९८ एडी', पत्नीच्या अभिनयाबद्दल अभिनेता स्पष्टच म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 12:51 PM

'कल्कि २८९८ एडी' सिनेमा रणवीरने दीपिकासोबत बघितला. सिनेमा पाहून रणवीरने दीपिकाच्या अभिनयाबद्दल खास पोस्ट शेअर केलीय (kalki 2898 ad, ranveer singh, deepika padukone)

 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाला उद्या रिलीज होऊन आठवडा पूर्ण होईल. 'कल्कि २८९८ एडी' सिनेमात दिग्गज आणि लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. कमल हासन, अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमात दीपिकाने साकारलेल्या 'सुमती' या व्यक्तिरेखेचं खूप कौतुक होतंय. अशातच दीपिकाचा पती आणि सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगने 'कल्कि २८९८ एडी' पाहून त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

रणवीरला 'कल्कि २८९८ एडी' सिनेमा कसा वाटला?

'रणवीर-दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत रणवीर त्याची फॅमिली आणि कुटुंबासोबत 'कल्कि २८९८ एडी' सिनेमा पाहायला एका थिएटरमध्ये गेलेला दिसला. गरोदर असलेली दीपिका रणवीरचा हात धरत थिएटरबाहेर आलेली दिसली. सिनेमा पाहून रणवीरने इन्स्टाग्रामवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. रणवीर लिहितो, "कल्की 2898 एडी सिनेमा एक भव्य सिनेमॅटिक देखावा आहे! मोठ्या पडद्यावरचा सिनेमा म्हणजे काय याची जाणीव मला कल्कि पाहून झाली.  तांत्रिकदृष्ट्या अभुतपूर्व कामगिरी केलेला भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे कल्की."

रणवीर दीपिकाच्या अभिनयाबद्दल काय म्हणाला?

'कल्कि २८९८ एडी' सिनेमा पाहून रणवीरने पत्नी दीपिका पादुकोणला चिअर केले. तिच्याविषयी रणवीर म्हणाला, “माय बेबी दीपिका..  सिनेमातला प्रत्येक क्षण तू तुझ्या प्रतिभेने आणि अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहेस. अशी मार्मिकता, अशी कविता, अशी शक्ती तुझ्याकडे आहे. तू कल्पनेच्या पलीकडे काम केले आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो." अशाप्रकारे रणवीरने पत्नी दीपिकाच्या 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाचं कौतुक केलंय. 

टॅग्स :अमिताभ बच्चनप्रभासरणवीर सिंगदीपिका पादुकोणकमल हासन