Join us

असा साजरा करणार रणवीर सिंग दीपिका पादुकोणसोबत व्हॅलेंटाइन डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 18:30 IST

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण लग्नानंतर पहिल्यांदा व्हॅलेंटाइन डे साजरा करणार आहे. रणवीरने त्याच्या व्हॅलेंटाइन डेच्या प्लानबद्दल सांगितले.

बॉलिवूडमध्ये यंदा व्हॅलेंटाइन डेची धूम पाहायला मिळणार आहे. विशेष करून बॉलिवूडमधील नवीन जोडपी आपले पहिले व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. या जोडप्यांमध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते रणवीर सिंगदीपिका पादुकोणकडे. त्यात नुकतेच रणवीर सिंगने त्याच्या पहिल्या व्हॅलेंटाइन डेबाबत खुलासा केला आहे.   रणवीर सिंग म्हणाला की, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी माझा गली बॉय सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्यादिवशी मी दीपिकाला गली बॉय दाखवायला घेऊन जाईन. मला वाटते की हा चांगला सिनेमा असून तिलादेखील आवडेल.

तो पुढे म्हणाला की, गली बॉय पाहिल्यानंतर दीपिकाला माझा अभिमान वाटेल आणि कदाचित ती माझे कौतूक करेल. कदाचित मी माझ्या पत्नीला गली बॉय पाहायला घेऊन जात आहे आणि तुम्हीही तुमच्या व्हॅलेंटाइनला सिनेमा पाहायला नक्की घेऊन जा. 

 जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर स्ट्रिट रॅपर डिवाईन व नैजीची स्टोरी सांगणार आहे. डिवाईन व नैजी हे दोघेही मुंबईच्या झोपडपट्टीत राहिलेले आणि पुढे रॅपच्या दुनियेत धूम करणारी दोन व्यक्ती आहेत. अतिशय संघर्षाने डिवाइन व नैजीने आपली ओळख निर्माण केली. ‘गली बॉय’ हा चित्रपट मुख्यत: याच दोघांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे. २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात रणवीर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रणवीर व आलियाची जोडी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगगली ब्वॉय