जोया अख्तर आणि रोहित शेट्टीच्या चित्रपटानंतर 'या' दिग्दर्शकच्या चित्रपटात होऊ शकते रणवीर सिंगची एंट्री !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 9:37 AM
सध्या रणवीर सिंग त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'गल्ली बॉय' आणि 'सिम्बा' चित्रपटात दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रणवीर ...
सध्या रणवीर सिंग त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'गल्ली बॉय' आणि 'सिम्बा' चित्रपटात दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रणवीर सिंगचे शेड्यूल आणखीन व्यस्त होणार आहे त्याला कारणही तसेच आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या चित्रपटात त्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा झिरोनंतर दुसऱ्या एका प्रोजेक्टच्या प्लॉनिंगला लागले आहेत. बाप-मुलाच्या नात्यावर आधारित चित्रपट तयार करण्याचे त्यांचे प्लॉनिंग सुरु आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राकेश मेहरा यांच्याकडे बाप-मुलाच्या नात्यावर आधारित चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे. ज्यात वडिल आणि मुलामधला जनरेशन गॅप दाखवला जाणार आहे. या चित्रपटासाठी एक जेष्ठ आणि एका तरूण अभिनेत्याला कास्ट केले जाणार आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, रणवीर सिंग आणि ओमप्रकाश मेहरा गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र काम करण्याबाबत चर्चा करतायेत. राकेश यांनी रणवीरला एक चित्रपटाची कथा ऐकवली आहे. ती रणवीरला आवडलीदेखील आहे. मात्र रणवीरने अजून हा चित्रपटात साईन केलेला नाही. रणवीरच्या इतर चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर ‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’हा सिनेमा तेलगू चित्रपट ‘टेंपर’चा रिमेक आहे. पण रोहित शेट्टीचे मानाल तर हा पूर्णपणे ‘टेंपर’चा रिमेक नसेल. केवळ २० टक्के भाग ‘टेंपर’मधून घेतला जाईल. टेंपरमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र सिम्बामध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे.‘सिम्बा’ हा चित्रपट २८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर जोया अख्तरच्या गली बॉयमध्ये रणवीर सिंगच्या अपोझिट आलिया भट्ट दिसणार आहे. रणवीर व आलिया या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. ‘गली बॉय’मध्ये एका स्ट्रिट रॅपरची कथा असल्याचे कळतेय. ALSO READ : रणवीर सिंगच्या आजीचे निधन; तिच्यामुळेच बनला अभिनेता!