Join us

रणवीर सिंगच्या 'सिम्बा' रिलीज होण्याआधी पत्नी दीपिका पादुकोण केली 'ही' भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:00 IST

अभिनेत्री दीपिका पादुकोण- रणवीर सिंग लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. नुकतेच हे कपल ईशा अंबानीच्या लग्नात एकत्र स्पॉट झाले होते.

ठळक मुद्दे'सिम्बा'मध्ये रणवीर सिंगसोबत सारा अली खान दिसणार आहे. येत्या २८ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

अभिनेत्री दीपिका पादुकोण- रणवीर सिंग लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. नुकतेच हे कपल ईशा अंबानीच्या लग्नात एकत्र स्पॉट झाले होते. दीपिकाने रणवीरचा आगामी सिनेमा 'सिम्बा' रिलीज होण्या आधीच तो ब्लॉकबस्टर ठरले असे म्हटले आहे. एक अवॉर्ड सोहळ्या दरम्यान दीपिका म्हणाली, मला असे वाटते की हा सिनेमा यशस्वी होईल. सध्या आम्ही फक्त सिनेमाच्या रिलीजवर लक्षक्रेंदीत केले आहे त्यानंतर हनीमूनचा आणि वाढदिवसाबाबत विचार करु.       

दीपिका म्हणाली, मला रोहित शेट्टीसोबत चेन्नई एक्स्प्रेसमध्ये एकत्र काम करताना मजा आली होती. त्याचबरोबर मी हे सांगू इच्छिते की, हा सिम्बासुद्धा 'ब्लॉकमास्टर' ठरले.    

 

'सिम्बा'मध्ये रणवीर सिंगसोबत सारा अली खान दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती केली जात आहे. ‘सिम्बा’हा  चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र ‘सिम्बा’मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. ‘सिम्बा’या सिनेमात रणवीरपहिल्यांदा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या सिनेमात भरपूर अॅक्शन आणि कॉमेडी करताना दिसणार आहे. येत्या २८ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग